AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhhav Thackeray Interview : शिवसेना कायम ठाकरेंचीच, जनताच निवडणुकीत पुरावे देणार- उद्धव ठाकरे

शिवसेना कायम ठाकरेंचीच, जनताच निवडणुकीत पुरावे देणार- उद्धव ठाकरे

Udhhav Thackeray Interview : शिवसेना कायम ठाकरेंचीच, जनताच निवडणुकीत पुरावे देणार- उद्धव ठाकरे
Image Credit source: twitter
| Updated on: Jul 26, 2022 | 2:07 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार शिवसेना आमचीच असा वारंवार दावा करत आहेत. त्यामुळे ठाकरेंवरच शिवसेना आमची असल्याचे पुरावे द्यावे लागत आहेत. हाच प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. तेव्हा शिवसेना कायम ठाकरेंचीच आहे. त्यासाठी आम्हाला पुरावे देण्याची गरज नाही. जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. जनताच आमचे पुरावे देईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचं बंड, राज्यात झालेलं सत्तांतर यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली मुलाखत (Udhhav Thackeray Interview) झाली. सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ही मुलाखत घेतली. आज त्याचा एक भाग प्रसिद्ध झालाय आणि उद्या दुसरा भाग प्रसिद्ध होईल.

‘परिवारातला समजून त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला’

पुढे संजय राऊतांनी विचारलं, नक्की काय चुकलं असं वाटतं? त्यावर उद्धव ठाकरेंचं उत्तर असं की, चूक माझी आहे ते मी माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये पहिल्यांदाच सांगितलं आहे. मी कबूल केलं आहे गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातला समजून मी यांच्यावरती अंधविश्वास ठेवला.

‘ही तर राक्षसी महत्वाकांक्षा’

तुमचे मुख्यमंत्री होणं चुकलं का? असा प्रश्न राऊतांनी विचारला. त्यावर ठाकरे म्हणाले, या दोन गोष्टी आहेत समजा मी त्या वेळेला यांना मुख्यमंत्री केला असतं तर यांनी दुसरंच काहीतरी केलं असतं. कारण यांची भूकच भागत नाहीये. यांना मुख्यमंत्री पदही हवं आहे आणि यांना शिवसेना पक्षप्रमुखही व्हायचं आहे. शिवसेना पक्षप्रमुखांसोबत यांची तुलना करावी लागली ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे. त्याला हाव म्हणतात. एक दिलं की तुझं तेही माझं आणि माझं तेही माझंच इथपर्यंत यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणाला सीमा नसते.

“शिवसेना कायम ठाकरेंचीच”

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार शिवसेना आमचीच असा वारंवार दावा करत आहेत. त्यामुळे ठाकरेंवरच शिवसेना आमची असल्याचे पुरावे द्यावे लागत आहेत. हाच प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. तेव्हा शिवसेना कायम ठाकरेंचीच आहे. त्यासाठी आम्हाला पुरावे देण्याची गरज नाही. जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. जनताच आमचे पुरावे देईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नाहीत- उद्धव ठाकरे

ठाण्यात पहिल्यांदा शिवसेनेचा बगवा झेंडा फडकला.बाळासाहेब त्यांच्या पूर्ण कारकीर्दीत सांगत राहिले. त्याच ठाण्यातील नेत्यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय. तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारला असता. ठाणेकर सूज्ञ आहेत. हा पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.