आदित्य ठाकरे विरुद्ध सुजात आंबेडकर, वरळीतील व्हॉट्सअप ग्रुपवर एकच चर्चा!

| Updated on: Sep 20, 2019 | 4:26 PM

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Sujat Ambedkar vs Aaditya Thackeray) हे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. मात्र आदित्य ठाकरे यांच्याविरोधात (Sujat Ambedkar vs Aaditya Thackeray) निवडणूक लढवणाऱ्यांची यादी वाढत आहे.

आदित्य ठाकरे विरुद्ध सुजात आंबेडकर, वरळीतील व्हॉट्सअप ग्रुपवर एकच चर्चा!
Follow us on

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Sujat Ambedkar vs Aaditya Thackeray) हे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. मात्र आदित्य ठाकरे यांच्याविरोधात (Sujat Ambedkar vs Aaditya Thackeray) निवडणूक लढवणाऱ्यांची यादी वाढत आहे.  आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्याविरोधात आरपीआयच्या एका गटाचे सचिन खरात यांनी आधीच आव्हान दिलं.

त्यानंतर आता काँग्रेसने अॅडव्होकेट सुरेश माने यांना उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. मात्र या यादीत आता वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांचं नाव चर्चेत आहे.

सोशल मीडियावर तशा पोस्ट व्हायरल होत आहेत. फेसबुकवर भारिप बहुजन महासंघ या पेजवर तर आदित्य ठाकरे विरुद्ध सुजात आंबेडकर यांचा सामना रंगणार असल्याची भली मोठी पोस्ट लिहण्यात आली आहे. मात्र हे भारिपचं अधिकृत पेज नाही.

या पेजवरील माहितीनुसार आदित्य ठाकरेंविरोधात सुजात आंबेडकर यांना वरळीतून मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरु आहेत.

सुजात आंबेडकर हे प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी वंचित आघाडीचा सोशल मीडिया आणि प्रचाराची धुरा सांभाळली होती. तेव्हापासून सुजात आंबेडकर वंचितचा उगवता नेता म्हणून उदयास येत आहे.

वंचितचं स्पष्टीकरण

दरम्यान, या व्हायरल पोस्टमागील सत्य जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 मराठीने वंचित आघाडीशी संपर्क साधला. वंचित आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ही पोस्ट खोटी असल्याचं सांगितलं. सध्या “सुजात आंबेडकर पक्षाचं काम करत आहेत. वंचितमध्ये घराणेशाही नको म्हणून तो पक्षाचं काम करत आहे. काम करुन जेव्हा तो स्वत:चं अस्तित्व निर्माण करेल, तेव्हा त्याचा विचार केला जाईल”,  असं सिद्धार्थ मोकळे म्हणाले.

सुजात आंबेडकर कोण आहे? 

  • सुजात आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा आहे.
  • 24 वर्षीय सुजात एक उत्तम ड्रमर आहे.
  • सुजातने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून राज्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.
  • 2016 ते 2018 दरम्यान चेन्नईच्या नामांकित एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
  • सध्या तो वंचित बहुजन आघाडीच्या युवाफळीचं काम पाहतो आहे.
  • लोकसभा निवडणुकी वंचित आघाडीच्या सोशल मीडिया सांभाळण्याची धुरा सुजातवर होती.