सुनेत्रा पवार यांचे पहिलेच भाषण, भावूक होत म्हणाल्या की…दादांचे स्वप्न पूर्ण..

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती.त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात विलीनीकरणावरुन दावे-प्रतिदावे केले जात असतानाच सुनेत्रा पवार यांनी आपले पहिले भाषण केले आहे.

सुनेत्रा पवार यांचे पहिलेच भाषण, भावूक होत म्हणाल्या की...दादांचे स्वप्न पूर्ण..
sunetra pawar first speech
| Updated on: Feb 15, 2026 | 10:57 PM

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर स्वत:ला सावरले आणि पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनास सुरुवात केली आहे. त्यांनी आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर भाषण देखील केले आहे. अजितदादा यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर १३ दिवसांनी त्यांनी प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री पदाचा प्रत्यक्षात चार्ज घेतला… आज त्यांनी आपले पहिले भाषण केले असून ते व्हायरल झाले आहे.

२८ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पाच जणांचा मुंबईहून बारामतीला येताना विमान कोसळून मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये विलीनीकरणावरुन कलगीतुरा सुरु झाला आहे. शरद पवार यांनी अजितदादांनी विलीनीकरणासंदर्भात बैठका घेतल्याचे सांगितले. तसेच १२ तारखेला अजितदादांशी आमची बैठक झाली होती. दादांनी एकत्र यायचे असे ठरवले होते. परंतू मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर झाल्या, त्यामुळे अंतिम बोलणी पुढे ढकलली गेल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. आता राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षाचे नेते विलीनीकरण हे निवडणूकांपुरते होते असा दावा करत आहेत. जर विलीनीकरणाची एवढी घाई कशाला केली जात आहे असा सवाल करत आहेत.

दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो

या सर्व पाश्र्वभूमीवर अजितदादांच्या याच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली आणि आता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. सुनेत्रा पवार यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना प्रोत्साहन आणि नवीन ऊर्जा देण्यासाठी भाषण करताना त्या भावूक झाल्या. दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत. तुम्ही दादांचे स्वप्न तुम्ही पूर्ण कराल याची खात्री आहे असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी त्यांच्या शेजारी कृषी मंत्री दत्ता भरणे देखील बसलेले दिसत आहेत.

Follow Us