AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छावा पदाधिकारी मारहाण प्रकरणात तटकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

छावा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

छावा पदाधिकारी मारहाण प्रकरणात तटकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
sunil tatkare
| Updated on: Jul 20, 2025 | 9:14 PM
Share

Sunil Tatkare : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या टेबलावर पत्ते आणून टाकल्याचा प्रकार घडला. या घनटेनंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता याच मारहाणीच्या प्रकरणावर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून अशा प्रकारची मारहाण करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले आहेत.

मारहाणीत सूरज चव्हाण असतील तर ते चूक आहे

विशेष म्हणजे मारहाण झालेल्या या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारताना दिसत आहेत. यावरच तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मारहाणीत सूरज चव्हाण असतील तर ते चूक आहे. मी याचं कधीच समर्थन करणार नाही, असे तटकरे म्हणाले. तसेच मी शांततावादी कार्यकर्ता आहे. चर्चेतून देवाणघेवाणीतून अनेक प्रश्न सुटत असतात. छावा संघटनेचे पदाधिकारी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आले होते. मी त्यांची भावना शांततेने ऐकून घेतली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

मी त्याबाबत नाराजी व्यक्त करतो

सूरज चव्हाण या माराहाणीत असतील तर ते चुकीचेच आहे. मी याचे कधीही समर्थन करणार नाही. योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मी आयुष्यात कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही. छावा पदाधिकाऱ्याला मारहाण झाली ही चूक घडली. मी त्याबाबत नाराजी व्यक्त करतो, अशी भूमिकाही तटकरे यांनी जाहीर केली.

नेमकं काय घडलं होतं?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी हा गेम खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विरोधकांनी तर या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच घेरलंय. तटकरे यांनाही लातूरमध्येही अशाच विरोधाला तोंड द्यावे लागले. ते लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने त्यांच्याजवळ येत टेबलवर पत्ते टाकले आणि कृषीमंत्र्यांना हे द्या. विधिंडळात पत्ते खेळू नका असे सांगण्याचे आवाहन केले. यावेळी कोकाटे यांच्याकडून राजीनामा घ्यावा, अशी मागणीही या पदाधिकाऱ्याने केली. या घटनेनंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत छावा संघटनेच्या त्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळही केली.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा