निकालाआधीच डॉ. सुजय विखे ‘खासदार’

| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांना निवडून येण्याआधीच ‘खासदार’ झाल्याचा मान मिळाला आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या एका समर्थकाने आपल्या मुलीच्या लग्नपत्रिकेत चक्क प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. सुजय विखे यांच्या नावा पुढे ‘संसद सदस्य, भारत सरकार’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सध्या ही लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]

निकालाआधीच डॉ. सुजय विखे खासदार
Follow us on

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांना निवडून येण्याआधीच ‘खासदार’ झाल्याचा मान मिळाला आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या एका समर्थकाने आपल्या मुलीच्या लग्नपत्रिकेत चक्क प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. सुजय विखे यांच्या नावा पुढे ‘संसद सदस्य, भारत सरकार’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सध्या ही लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र असलेल्या सुजय विखे पाटील यांनी यावेळी भाजपकडून निवडणूक लढविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही संग्राम जगताप यांना मैदानात उतरवून सुजय यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या नजरा या मतदारसंघातील निकालाकडे लागल्या आहेत. मात्र, विखे समर्थकांनी आधीच आपल्या पद्धतीनं निवडणुकीचा निकाल लावून टाकला आहे.

‘नगर दक्षिण’ची लढाई

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेसला खिंडार पाडत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना पक्षात घेतलं. सुजय विखेंना नगर दक्षिणमधून लोकसभेची तिकीट देत, रिंगणातही उतरवलं. आघाडीच्या जागावाटपादरम्यान राष्ट्रवादीने काँग्रेससाठी ही जागा सोडण्यास नकार दिल्याने, सुजय विखेंना भाजपची वाट धरावी लागली असली, तरी राष्ट्रवादीनेही नगर दक्षिणची जागा जिंकण्यासाठी मोठी कसरत केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवून, राष्ट्रवादीने सुजय विखेंना जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. आता ‘नगर दक्षिण’मध्ये कोण जिंकतं, हे 23 मे रोजी स्पष्ट होईल.

पाहा बातमीचा व्हिडीओ :