गुलाम नबी आझाद यांना जम्मूला जाण्यास परवानगी, गरज पडल्यास मी सुद्धा जाईन : सरन्यायाधीश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad ) यांना जम्मू काश्मीरमध्ये जाण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली.

गुलाम नबी आझाद यांना जम्मूला जाण्यास परवानगी, गरज पडल्यास मी सुद्धा जाईन : सरन्यायाधीश
| Updated on: Sep 16, 2019 | 1:07 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad ) यांना जम्मू काश्मीरमध्ये जाण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली. कोर्टाच्या निर्णयानुसार गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad ) जम्मू काश्मीरच्या चार जिल्ह्यात जाऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India, Ranjan Gogoi) यांनीही जर आवश्यकता भासली तर आपण स्वत:ही जम्मू काश्मीरला जाऊ शकतो, असंही नमूद केलं.

गुलाम नबी आझाद यांनी जम्मू काश्मीरला जाण्यास परवनागी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने आझाद यांना श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग आणि जम्मू या जिल्ह्यात जाण्यास परवानगी दिली. मात्र तिथे जाऊन जनसभा किंवा सार्वजनिक भाषण करु नये अशी अट कोर्टाने घातली.

यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गरज पडल्यास आपण स्वत:ही जम्मू काश्मीर दौरा करण्यास तयार असल्याचं नमूद केलं.

राष्ट्रहितासाठी शाळा, रुग्णालये, परिवहन इत्यादी सेवा पूर्ववत करा, असे आदेश कोर्टाने दिले. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर त्याविरोधात केलेल्या याचिकांवरही सुनावणी झाली.

सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले, “आम्ही केंद्र आणि जम्मू काश्मीरला निर्देश देतो की या सर्व याचिकांवर सप्टेंबरपर्यंतच प्रतिज्ञापत्र सादर करा”