Devendra Fadnavis : गिफ्टपेक्षा सरप्राईज गिफ्ट फार महत्त्वाचं, तुम्हालाही ते योग्यवेळी मिळणार, फडणवीसांचं मेटेंना आश्वासन

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमचं सरकार ओबीसींचं आरक्षण परत मिळवेल. ओबीसींना नक्कीच आरक्षण देऊ. आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी सरकारमध्ये आलो नाही. समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या जीवनात सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्यासाठी आलो आहोत, असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : गिफ्टपेक्षा सरप्राईज गिफ्ट फार महत्त्वाचं, तुम्हालाही ते योग्यवेळी मिळणार, फडणवीसांचं मेटेंना आश्वासन
गिफ्टपेक्षा सरप्राईज गिफ्ट फार महत्त्वाचं, तुम्हालाही ते योग्यवेळी मिळणार, फडणवीसांचं मेटेंना आश्वासन
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 4:01 PM

मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांचं अभिष्टचिंतन करू इच्छितो. भारतीताई तुम्ही म्हणाल्या, गिफ्ट. तुम्हाला माहीत आहे का? गिफ्टपेक्षा सरप्राईज गिफ्ट फार महत्त्वाचं असतं. मला मिळालं ना सरप्राईज गिफ्ट. मी विरोधी पक्षनेत्याचा माजी मुख्यमंत्री बनायला गेलो होतो. तसं पत्रकार परिषदेत घोषितही केलं होतं. पण माझ्या नेत्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं आणि सांगितलं तुम्ही सत्तेत जा आणि मी उपमुख्यमंत्री झालो. म्हणून मी सत्तेत आलो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. राजकारणातील (politics) गिफ्ट हे घोषित केलेलं नसतं. ते सरप्राईज गिफ्टच असतं. पण ते योग्यवेळी मिळणार. याबद्दल तुमच्या मनात शंका ठेवू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विनायक मेटे यांना आश्वस्त केलं. विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमचं सरकार ओबीसींचं आरक्षण परत मिळवेल. ओबीसींना नक्कीच आरक्षण देऊ. आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी सरकारमध्ये आलो नाही. समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या जीवनात सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्यासाठी आलो आहोत, असं फडणवीस म्हणाले.

कुणालाही दुखावण्यासाठी नामांतर नाही

कोणत्याही धर्माला दुखावण्यासाठी नामांतर करण्यात आलेलं नाही. जगात आक्रमाकांचे नाव आणि खाणाखुणा यांचं नामोनिशाण मिटवण्यात येतं. गुलामीच्या पाऊलखुणा आम्ही मिटवत आहोत. त्याला काही लोक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही ते म्हणाले.

शिवसंग्रामसहीत सर्वांना सत्तेत घेणार

पुन्हा नव्याने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र हे सरकार शिवसंग्रामसहीत सर्वाना सत्तेत सामावून घेणार आहे, असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे पडू दिला नाही. मागच्यावेळी आपण जी मेहनत केली होती. ती शून्यात मिळवण्याचं काम मागच्या सरकारने केलं. जे सरकारच्या हातात होतं ते सरकारने केलं नाही. आता आपण सत्तेत आहोत. रस्ता कठिण आहे. पण हा रस्ताही आपण पार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंना टोला

मागच्या सरकारने जे सरकारच्या हातात होतं ते देखील केलं नाही. एक मंत्रिमंडळ उपसमिती होती. ती नेमकी काय करायची माहीत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री हे वेळ द्यायचे की नाही माहीत नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.