मी गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावई…; सुशीलकुमार शिंदेंचा आरक्षणाबाबत मोठा गौप्यस्फोट

सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) हे मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण (Reservation) देण्यात आले. आपण गुजराती समाजाला आरक्षण का दिले हे सांगताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मी गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावई...; सुशीलकुमार शिंदेंचा आरक्षणाबाबत मोठा गौप्यस्फोट
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 10:36 AM

सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) हे मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण (Reservation) देण्यात आले. या आरक्षणाबाबत आता सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. माझा जावई गुजराती आहे. माझ्या जावयामुळे (son in law) मी गुजराती समाजाला आरक्षण दिल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर हे सगळे करावेच लागते, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिले होते. हे एक चांगलं काम मी केलं. त्यामुळेच मी पुन्हा निवडून येऊ शकलो.  मात्र लोकांना आता मी केलेल्या या कामाचा विसर पडल्याचेही शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना शिंदे यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पक्षातील लोकांनीच मला कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरू काढले, मात्र त्यांचा त्यानंतर कायमच पराभव झाला असं शिंदे यांनी म्हटलं आहे.