राजू शेट्टींचं ठरलं, गोकुळच्या निवडणुकीत मल्टीस्टेटच्या मुद्यावर ‘या’ गटाला पाठिंबा

| Updated on: Apr 28, 2021 | 12:27 PM

माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोकुळच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या कोल्हापूरमधील नेत्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. ( Raju Shetti Gokul Election)

राजू शेट्टींचं ठरलं, गोकुळच्या निवडणुकीत मल्टीस्टेटच्या मुद्यावर या गटाला पाठिंबा
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us on

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या कोल्हापूरमधील नेत्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांना गोकुळनं सांभाळलं. गोकुळ मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे. गोकुळ मल्टीस्टेट न करण्याच्या मुद्यावर सत्ताधारी गटाला पाठिंबा देत आहे, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. ( Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetti announced support for Mahadevrao Mahadik Panel)

गोकुळमुंळं दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य

राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना, दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी आम्ही लढा दिला. गोकुळमुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना आर्थिक स्थर्य आलं आहे. दुधाच्या दरासाठी अनेकवेळा गोकुळ विरोधात आंदोलन केलं आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांना गोकुळने सांभाळलं, असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

गोकुळच्या सत्ताधारी गटाला पाठिंबा का?

स्वाभिमानी शेतकरी संघटेनेची भूमिका राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ मल्टिस्टेट करण्याला आमचा विरोध आहे. गोकुळ मल्टीस्टेट न करण्याच्या मुद्यावरच स्वाभिमानी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देत आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

गोकुळसाठी 2 मेला मतदान

गोकुळ दूध संघासाठी जिल्ह्यात 35 केंद्रांवर मतदान होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यावेळी पहिल्यांदाच मतदान केंद्रांची विभागणी करण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी तालुक्यांच्या ठिकाणी मतदान केंद्र बनवण्यात आली आहेत. मतदान केंद्रांची ठिकाणं निश्चित झाली असून यंत्रणेकडून तयारीला वेग आला आहे. गोकुळसाठी 2 मे रोजी मतदान होणार आहे, तर, 4 मे ला मतमोजणी होणार आहे, रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, गोकुळची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी सत्ताधारी गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली होती. गोकुळच्या निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळालेत.

संबंधित बातम्या:

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान

सत्ताधारी गटातील संचालक विरोधकांच्या गळाला, गोकुळ दूध संघ निवडणुकीत चुरस

( Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetti announced support for Mahadevrao Mahadik Panel)