राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याने पैज हरली, मात्र शब्द पाळला!

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकले. कार्यकर्त्यांनीही आपआपल्या नेत्याच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करत, अनोख्या पैजा लावल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या जय-पराजयाबाबतही अशीच अनोखी पैज पाहायला मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनोखी पैज लागली. हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील कामेरी […]

राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याने पैज हरली, मात्र शब्द पाळला!
| Edited By: | Updated on: May 29, 2019 | 11:12 AM

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकले. कार्यकर्त्यांनीही आपआपल्या नेत्याच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करत, अनोख्या पैजा लावल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या जय-पराजयाबाबतही अशीच अनोखी पैज पाहायला मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनोखी पैज लागली.

हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील कामेरी गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुका उपाध्यक्ष खासेराव उर्फ काशिनाथ निबांळकर आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्या  कार्यकर्त्यांमध्ये ही अनोखी पैज लागली.

ज्याचा उमेदवार हरेल त्याने स्वत:ची केस, दाढी आणि मिशा काढायच्या अशी ही पैज होती. लोकसभेचा निकाल 23 मे रोजी जाहीर झाला. या निकालात राजू शेट्टी यांचा पराभव झाला आणि शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी बाजी मारली.

राजू शेट्टी हरल्यामुळे काशिनाथ निंबाळकर हे पैज हरले, मात्र त्यांनी शब्द पाळत स्वत:चे केस, दाढी आणि मिशा काढल्या.