AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाचा सर्वात मोठा निर्णय; थेट 3 वाजता… मोठी घडामोड काय?

ठाण्यात शिंदे गटाच्या धमक्यांना न जुमानता ठाकरे गटानं आंदोलनाचा निर्धार केला आहे. खासदार नरेश म्हस्केंच्या इशाऱ्यानंतरही ठाकरे गट आज दुपारी 3 वाजता ठाण्यात दाखल होणार आहे. संजय राऊत यांनी पूर्णेकर हत्या प्रकरणावरून शिंदे गटाला थेट आव्हान देत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

ठाकरे गटाचा सर्वात मोठा निर्णय; थेट 3 वाजता... मोठी घडामोड काय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 10:34 AM
Share

ठाण्यात येऊन आमच्या विरोधात अपशब्द वापरले तर ती व्यक्ती ठाण्यातून परत जाणार नाही, अशी धमकीच शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला दिली होती. ठाकरे गटाने आज ठाण्यात आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर म्हस्के यांनी ही धमकी दिली होती. त्यावर ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने ठाण्यात जाऊन आंदोलन करणारचं असा निर्धार जाहीर केला आहे. ठाणे कुणाच्या बापाची जहांगीर नाही. आम्ही 3 वाजता येतोय, असं खुलं आव्हानच ठाकरे गटाने दिल्याने ठाण्यातील वातावरण अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज ठाण्यात काय घडतंय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटालाच उलटं आव्हान दिलं आहे. आम्ही आज ठाण्यात 3 वाजता जात आहोत. ठाणे कुणाच्या बापाची जहांगीर नाहीये. पूर्णेकरांच्या हत्येची सुपारी कोणी दिली? हे विचारणं म्हणजे तुमच्या नेत्याची बदनामी आहे का? आमचे सवाल तुम्हाला का टोचत आहेत? ज्या मुलाने बाप गमावला, ज्या महिलेने नवरा गमावला, ते जर न्यायासाठी तडफडत असतील तर त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

सत्ताधारीच लोक अशा धमक्या देत असतील तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पोलीस आयुक्तांना बदललं पाहिजे. विरोधी पक्षाच्या खासदार आणि आमदारांना तुम्ही बघून घेऊ ही धमकी देता? ठोसा असायला आधी मनगट असावं लागतं. मनगट हे स्वाभिमानी माणसाकडे असतं. पळपुटे किंवा गद्दाराकडे नसतं. आम्ही कुणाबद्दल अपशब्द काढला नाही. पूर्णेकरांच्या मुलांना न्याय द्या. माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती खून करणाऱ्यांसोबत काय करत होते? ते खुन्यांना मार्गदर्शन करत होते. कुठे गोळ्या चालवायच्या? कशा चालवायच्या? हे सांगत होते. तरीही पोलीस अटक करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नक्की दबाव असणार. मग दबाव कुणाचा? दबाव ट्रम्पचा असणार नाही. फडणवीसांचा असणार नाही, गणेश नाईकांचा नाही. मग तुम्हाला का टोचलं? असा सवाल राऊत यांनी केला.

दोन झापडीचे नाहीत

सत्ताधारी पक्षाला गुंडगिरीवर उतरायचं असेल तर ती जबाबदारी पोलीस आयुक्त, गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांची आहे. धमकी देणारे दोन झापडीचे नाहीत. बाजूला पोलीस आहेत म्हणून त्यांची जीभ चुरचुर चालते. काय यांची औकात आहे? सत्ता आहे म्हणून, नाही तर लोक रस्त्यावर उतरून यांना मारतील. एक खून झालाय. हत्याराच्या समर्थनार्थ तुम्ही मला धमकी देता? आम्ही खूप धमक्या पाहिल्या. हिंमत असेल तर या. काय करणार आहात तुम्ही? असं आव्हानच त्यांनी दिलं.

Follow Us
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन