अनिल परब, गुलाबराव पाटील निश्चित, शिवसेनेच्या 13 मंत्र्यांची यादी

| Updated on: Dec 30, 2019 | 9:14 AM

रवींद्र वायकर, दीपक केसरकर, दिवाकर रावते या फडणवीस सरकारमधील मंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे.

अनिल परब, गुलाबराव पाटील निश्चित, शिवसेनेच्या 13 मंत्र्यांची यादी
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. अॅड अनिल परब, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्यासह 13 जण मंत्रिपदाची शपथ (Shivsena Minister List) घेण्याची चिन्हं आहे.

‘मातोश्री’वरुन शिवसेना आमदारांना फोन करण्यात आले आहेत. मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांची सांगड घालत मंत्र्यांची यादी झाल्याचं दिसत आहे. रवींद्र वायकर, दीपक केसरकर, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत या फडणवीस सरकारमधील मंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण?

अॅड अनिल परब – मुंबई (विधानपरिषद)
उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी) – कोकण
संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ) – विदर्भ
गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव) – उत्तर महाराष्ट्र
दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक) – उत्तर महाराष्ट्र
अब्दुल सत्तार – सिल्लोड (औरंगाबाद) – मराठवाडा
डॉ. संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद) – मराठवाडा
शंभूराजे देसाई – पाटण (सातारा) – पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार

बच्चू कडू (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती)
शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर)
राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ (कोल्हापूर)

आतापर्यंत सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवसेनेकडे कोणकोणती खाती?

एकनाथ शिंदे (10)
गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

सुभाष देसाई (12)
उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये आणि राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

BREAKING | ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी

काँग्रेसकडून कोण?

काँग्रेसकडून अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम हे राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

राष्ट्रवादीकडून कोण?

नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे हे ठाकरे मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेण्याची चिन्हं आहेत. आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

ठाकरे सरकार

सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले.

Shivsena Minister List