AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी

अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत

BREAKING | ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार : काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 30, 2019 | 8:15 AM
Share

मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या काँग्रेस आमदारांची अधिकृत यादी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार यांच्यासह 10 नेते मंत्रिपदाची शपथ (Congress Ministers List) घेणार आहेत.

अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम हे राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

काँग्रेसमधून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी (Congress Ministers List)

अशोक चव्हाण (कॅबिनेट मंत्री) – भोकर (नांदेड) के सी पाडवी (कॅबिनेट मंत्री) – अक्कलकुवा (नंदुरबार) विजय वडेट्टीवार (कॅबिनेट मंत्री) – ब्रह्मपुरी (चंद्रपूर) अमित देशमुख (कॅबिनेट मंत्री) – लातूर शहर (लातूर) सुनिल केदार (कॅबिनेट मंत्री) – सावनेर (नागपूर) यशोमती ठाकूर (कॅबिनेट मंत्री) – तिवसा (अमरावती) वर्षा गायकवाड (कॅबिनेट मंत्री) – धारावी (मुंबई) अस्लम शेख (कॅबिनेट मंत्री) – मालाड पश्चिम (मुंबई)

सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद) डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

या नेत्यांचा समावेश नाही

पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे या आमदारांचा मंत्रिमंडळाच्या यादीत समावेश नाही. पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते.

काँग्रेसच्या वाट्याला महसूल, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम ही 3 महत्वाची खाती आहेत. काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे, आमची यादी तयार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते. मात्र आता काँग्रेसचीच अधिकृत यादी सर्वप्रथम समोर आली आहे. वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांच्यापैकी कोणाकडे महिला आणि बालकल्याण विभागाची धुरा जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, शपथविधीसाठी शरद पवारांचा आमदारांना फोन

अद्याप आम्हाला मंत्रिपदाच्या शपथविधीबाबत (Congress Ministers List) कोणताही फोन आलेला नाही. तुमचा फोन आल्यानंतर मला ही माहिती मिळाली. जो काही कॉमन मिनिमम प्रोगाम ठरला आहे. त्यानुसार मी काम करेन, अशी प्रतिक्रिया आमदार अस्लम शेख यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

मला नुकतंच ही माहिती मिळाली. माझा कॅबिनेटपदी समावेश केल्याबद्दल सोनिया गांधी, बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांचे आभार. मंत्रिपद ही माझ्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. पक्षाला बळकटी देण्यासाठी मला ही जबाबदारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार, मला मंत्रिपदासाठी पात्र समजल्याने अगदी भरुन आलं आहे, अशी प्रतिक्रिया आमदार विजय वडेट्टीवार यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

काँग्रेसकडे कोणती खाती?

बाळासाहेब थोरात (05) महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (पदुम).

नितीन राऊत (06)

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

ठाकरे सरकार

सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले.

Congress Ministers List

Follow Us
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.