देशमुखांवरील आरोपाचा तपास सीबीआयकडे; सरकार निकालपत्राचा अभ्यास करुनच बोलेल: संजय राऊत

| Updated on: Apr 05, 2021 | 2:31 PM

हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर गेला असेल. त्यामुळे त्यांनीच आता यावर बोललं पाहिजे | Sanjay Raut Anil Deshmukh

देशमुखांवरील आरोपाचा तपास सीबीआयकडे; सरकार निकालपत्राचा अभ्यास करुनच बोलेल: संजय राऊत
संजय राऊत
Follow us on

मुंबई: अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा व्यवस्थित अभ्यास करण्याची गरज आहे. या सगळ्याची व्यवस्थित माहिती घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांनी बोललं पाहिजे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (Sanjay Raut on Parambir Singh matter probe handover to CBI by HC)

गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाकडून चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमवीर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, हे प्रकरण थोडंस राजकीय आहे. त्यामुळे उच्च न्यायालायाचे सविस्तर निकालपत्र आल्यानंतर त्याचा अभ्यास करावा लागेल. राज्य सरकारचे विधी व न्याय खाते आहे. गृहमंत्र्यांच्या अखत्यारित  कायदा खाते येते. त्या सगळ्यांकडून यावर विचार केला जाईल. सरकारने यासंदर्भात भूमिका मांडली पाहिजे. हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर गेला असेल. त्यामुळे त्यांनीच आता यावर बोललं पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘संपूर्ण निकाल आल्याशिवाय बोलणार नाही’

मी सरकारमधील व्यक्ती नाही. या सगळ्यावर सरकारमधील लोक बोलतील. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे केवळ प्रसारमाध्यमांच्या माहितीवर विसंबून याप्रकरणावर प्रतिक्रिया देता येणार नाही. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालपत्राचा अभ्यास केला जाईल. त्यानंतरच सरकारकडून यावर अधिकृत भाष्य केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘सीबीआय म्हणजे परमेश्वराचा अवतार नाही’

देशातील कोणतीही तपास यंत्रणा परमेश्वराचा अवतार नाही. प्रत्येक तपास त्या त्या पद्धतीने सुरु असतो. काल ममता बॅनर्जी यांनी देखील केंद्रीय तपास यंत्रणेबाबत फोटो पास केले आहेत. शेवटी आपली परंपरा आहे की आपण न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयापुढे मान झुकवतो, असे संजय राऊत यांनी म्हटले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर मोठ्या निर्णयाची शक्यता

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सिल्वर ओक वर बैठक पार पडली. या बैठकीत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे आता अनिल देशमुख गृहमंत्रीपदावरून पायउतार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

Param Bir Singh Anil Deshmukh Live Updates | परमबीर सिंग यांच्या अनिल देशमुख यांच्या विरोधीतील याचिकेवर मुंबई हायकोर्टात काय घडलं?

(Sanjay Raut on Parambir Singh matter probe handover to CBI by HC)