अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

कडे तुमचे राज्य नसून संविधानाचे राज्य चालते. तुम्ही कितीही धमक्या दिल्यात तरी मी मागे हटणार नाही. | Anil Deshmukh Jayashree Patil

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक
जयश्री पाटील, अनिल देशमुख

मुंबई: या राज्यात तुमची ताकद चालत नाही, तर संविधानाची ताकद चालते. ही मोगलाई नव्हे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सामान्य नागरिक आणि उद्योजकांना धमकावून भ्रष्टाचार करु शकत नाहीत, अशी टीका वकील जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी केली. (Advocate Jayashree Patil slams HM Anil Deshmukh)

मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी बहुचर्चित परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणावर सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला.

अनिल देशमुख ही मोघलाई नाही. याठिकाणी मोघली कायदे चालत नाहीत. इकडे तुमचे राज्य नसून संविधानाचे राज्य चालते. तुम्ही कितीही धमक्या दिल्यात तरी मी मागे हटणार नाही, असे जयश्री पाटील यांनी म्हटले.

अ‍ॅड. जयश्री पाटील नेमकं काय म्हणाल्या?

आज मी खूप खुश आहे. उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. 15 दिवसात अहवाल द्यायचा आहे. मला हे सांगायचं आहे, अनिल देशमुख तुम्ही गृहमंत्री असलात, तुमच्या अंडर महाराष्ट्र पोलीस आहे, त्यामुळे तुम्ही ही चौकशी योग्य प्रकारे करु शकत नाही. त्यामुळे कोर्टाने सीबीआयकडे प्राथमिक चौकशी दिली आहे. यामध्ये मलाही बोलावण्यास सांगितलं आहे.

मला हे सांगायचं आहे, अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असाल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय.

‘अनिल देशमुख तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही’

डायरेक्टर जनरल सीबीआय हे चौकशी करतील, आणि मला बोलावलं जावं असं कोर्टाने म्हटलं आहे. फक्त माझीच याचिका कोर्टाने ऐकली. कोर्टाने माझं खूप कौतुक केलं, कोणीतरी एक शूर आहे, जे समोर आले आहेत. एवढ्या मोठ्या 100कोटीच्या प्रकरणात कोणी एक तरी शूर आहे जे समोर आले आहेत, असे कोर्टाने सांगितल्याची माहिती जयश्री पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या:

अनिल देशमुखांना मोठा दिलासा, हायकोर्टाने जयश्री पाटलांना झापलं, लोकप्रियतेसाठीच याचिका केल्याची टिप्पणी

मोठी बातमी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

(Advocate Jayashree Patil slams HM Anil Deshmukh)

Published On - 11:48 am, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI