AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुखांना मोठा दिलासा, हायकोर्टाने जयश्री पाटलांना झापलं, लोकप्रियतेसाठीच याचिका केल्याची टीपणी

अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलीय

अनिल देशमुखांना मोठा दिलासा, हायकोर्टाने जयश्री पाटलांना झापलं, लोकप्रियतेसाठीच याचिका केल्याची टीपणी
जयश्री पाटील आणि अनिल देशमुख
| Updated on: Mar 30, 2021 | 9:52 PM
Share

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय. अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तसेच हा लोकप्रियतेसाठी केलेला स्टंट असल्याचं निरिक्षण नोंदवत पाटील यांना फटकारलं आहे (Mumbai High Court reject petition against Anil Deshmukh saying publicity stunt).

याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयातील आपल्या याचिकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया देत अशा याचिका स्वस्तातील लोकप्रियतेसाठी केल्या जात असल्याचं निरिक्षण नोंदवलं. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि मनिषा पिटाले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

न्यायालयाने जयश्री पाटील यांना या प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. यावेळी अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोनी यांनी न्यायालयाला सांगितलं की या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आधीच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर याचिका दाखल केलेली आहे. त्यावर बुधवारी (31 मार्च) सुनावणी होणार आहे. यावेळी त्यांनी पाटली यांची याचिका चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचंही म्हटलं.

दरम्यान, याआधी पाटील यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील महिन्याला 100 कोटी वसुलीच्या आरोपांनंतर मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. “भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे,” अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केलीये. (complaint registered against Anil Deshmukh under corruption allegations)

तक्रारीमध्ये शरद पवारांचं नाव

“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत,” असं पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटंलय. तसेच, यामध्ये मास्टरमाईंट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत, असा आरोपीही पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीमध्ये केलाय.

पॉवरपुल असले तरी गुन्ह्यातून सुटका करता येत नाही

यावेळी जयश्री पाटील यांनी या प्रकरणात मोठे नेते असले तरी कोणाचीही गुन्ह्यातून सुटका करता येत नाही, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचे सांगितले. तसेच, अनिल देशमुख, सचिन वाझे, शरद पवार यांच्या संदर्भातील संभाषणाचे पुरावे जतन होणे गरजेचे असल्याचेसुद्धा पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले.

आरोपी राष्ट्रवादीचे पुढारी म्हणून कारावाई नाही

जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केले. अनिल देशमुख हे स्वत:च गृहमंत्री असल्यामुळे कारवाई होत नसल्यचं पाटील यांनी म्हटलंय. “जेव्हा एखादा प्रकार निदर्शनास येतो. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून तत्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मात्र, या गुन्ह्यामध्ये तशी कारवाई होताना दिसत नाही. आरोपी हे स्वत: गृहमंत्रालयाचे प्रमुख आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पुढारी आहेत. त्यामुळे कायदेशी प्रक्रिया पार पाडली गेली नाही. किंवा परमबीर सिंग यांनी तशी हिम्मत दाखवली नाही. त्यामुळे सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणामध्ये संबंधितांविरुध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे,” असा आरोप पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत केला.

दरम्यान, पाटील यांनी तक्रार दाखल केली असली तरी, देशमुख यांच्याविरोधत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. पाटील यांच्या तक्रारीनंतर  आता मुंबई पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे.

कोण आहेत जयश्री पाटील? (Who is Jayashree Patil)

  • अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली
  • जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे
  • ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत .
  • जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलं
  • त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकं लिहिली आहेत

हेही वाचा :

माझाही फोन टॅप करण्यात आला होता, एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं खळबळ

‘.. आणि म्हणून फडणवीस घाबरले!’, नवाब मलिकांचा फडणवीसांवर पलटवार

Jitendra Awhad on Rashmi Shukla : आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात…

व्हिडीओ पाहा :

Mumbai High Court reject petition against Anil Deshmukh saying publicity stunt

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.