‘रत्नागिरीकरांनो, खचून जाऊ नका, पैसा भारी झालाय’, भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?

"शिवसेना हा अखंड पुढे जाणारा पक्ष आहे. शिवसेना स्थापन झाली त्यावेळेपासून कोकण त्यांच्या पाठिशी आहे", असं भास्कर जाधव म्हणाले.

'रत्नागिरीकरांनो, खचून जाऊ नका, पैसा भारी झालाय', भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 8:35 PM

रत्नागिरी : “रत्नागिरीकरांना सांगतो, खचून जावू नका. पैसा भारी झालाय. खासदारकीला उभा राहणार आहे. गुहागरकरांचा स्वप्न होतं तशाच पद्धतीने रत्नागिरीकरांचे स्वप्न आहे, रत्नागिरी तालुक्यावर भगवा फडकावयाचा. हक्काचा शिवसेनेचा माणूस निवडून देण्याची वेळ आलीय”, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर आणि भाजपवरही टीका केली.

“धनुष्यबाण ही निशाणी गोठवण्याचं कारणचं काय होतं? निवडणूक आयोगाने निशाणी गोठवली म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. किंवा शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटाने दावा केला म्हणून आम्ही कोर्टात गेलो. अंधेरी पोटनिवडणूक लढायची म्हणून शिंदे गटानं सांगितलं आणि धनुष्यबाण गोठवा, असं सांगितलं. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. धनुष्यबाण गोठवावे एवढीच त्यांची इच्छा होती.सुप्रीम कोर्टाने लोकशाहीच्या विरोधात निकाल दिलाय. कुठेच न्याय मिळाला नाही तरी जनता जर्नादनाच्या न्यायालयात न्याय मिळेल”, अशी भूमिका भास्कर जाधवांनी मांडली.

“शिवसेना हा अखंड पुढे जाणारा पक्ष आहे. शिवसेना स्थापन झाली त्यावेळेपासून कोकण त्यांच्या पाठिशी आहे. पहिल्या फळीतील 13 नेत्यांपैकी एक दताजी साळवी हे नेते होते. शिवसेना फुटली. पण तरीही सेनेचं नेतृत्व कोकणच करतंय”, असं भास्कर जाधव म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीच्या याद्या, त्याला अंतिम स्वरुप देण्याचं काम विनायक राऊत करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सदैव विनायक राऊत आहेत. पक्ष नव्या स्वरुपात उभा करावा लागतोय. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबा. आम्ही दोन्ही जिल्हे सांभाळतो”, असं देखील जाधव म्हणाले.

“भाजपचे षडयंत्र आहे, 40 गेलेत पण त्यांचे बारसे झालेच नाही. भाजपाच्या अध्यक्षांनी प्रादेशिक पक्ष ठेवयाचे नाही असं सांगितलंय”, असा दावा त्यांनी केला.

“भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या वेळी उमेदवारी मागे घेतली म्हणून उपकार केले नाहीत. अंधेरीची पोटनिवडणूक खरी झाली असती तर महाराष्ट्र पेटला असता”, असं जाधव म्हणाले.

“शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी मुलांचे नुकसान केलंय. आम्ही सिनियर सिटीझन, उद्याचे माझे नेतृत्व विक्रांत सुद्धा करू शकतो. आम्ही पक्ष सदस्य नोंदणी केलीय. त्यांची मनं आम्हाला कळली म्हणून त्यांचं मत आम्हाला मिळाली. आदित्य ठाकरे तुमची पुढची फळी आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले.

Non Stop LIVE Update
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.