माकड अन् किंग कोबरमध्ये ‘कबड्डी’, थरारक व्हिडिओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याला लाईक अन् कॉमेंट केल्या आहेत. काही जणांनी माकडाला साखळीने बांधल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हा माकड पाळीव असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मनोजरंजनासाठी माकडाचा वापर केल्याबद्दल युजर्स नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

माकड अन् किंग कोबरमध्ये  'कबड्डी', थरारक व्हिडिओ व्हायरल
Viral Video
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 9:59 AM

सोशल मीडियावर सध्या वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्यासंदर्भात व्हिडिओ इंटरनेट युजर्समध्ये चांगलेच लोकप्रिय होतात. दोन प्राण्यांमधील झुंज पाहण्यास सोशल मीडियावर पसंती दिली जाते. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ माकड अन् किंग कोबरामधील झुंज सुरु असल्याचा आहे. दोघांमध्ये जणू कबड्डी सुरु असल्याचा हा थरारक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये

व्हिडिओमध्ये माकड आणि किंग कोबरा यांच्यात लढाई होताना दिसत आहे. दोघे एकमेकांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या पद्धतीने झुंज देत असल्याचा थरार प्रथमच पाहण्यास मिळत आहे. दोघांमधील या लढाईचा शेवट काय होतो, हे पाहण्याची उत्सुक्ता व्हिडिओ दरम्यान लागते.

हे सुद्धा वाचा

कोणाचा होतो विजय

दोघांमध्ये कोण वर्चस्व गाजवते, कोणाचा विजय होतो, हे पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला किंग कोबरा आणि माकड एकमेकांच्या समोर दिसतात. कोबरा याला माकड चकवा देण्याचा प्रयत्न करत असतो. कोबराचे हल्ले सुरुच असतात. मग मधूनच माकड आक्रमक होत हल्ला करतो. १.५२ सेंकदाच्या या व्हिडिओत शेवटी माकड कोबऱ्यावर वर्चस्व निर्माण करतो. यामुळे किंग कोबरा निघून जातो. विशेष म्हणजे माकडाला साखळीने बांधून ठेवले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याला लाईक अन् कॉमेंट केल्या आहेत. काही जणांनी माकडाला साखळीने बांधल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हा माकड पाळीव असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मनोजरंजनासाठी माकडाचा वापर केल्याबद्दल युजर्स नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अनेक जणांनी हा व्हिडिओ रिपोस्ट केला आहे. सुशांत नंदा या अकाउंटवरुन हा व्हिडिओ X वर (ट्विटर) पोस्ट करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.