बाबा मुलाला म्हणत होते, पास हो… मुलाने वडिलांची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर केली व्हायरल

ssc board viral mark sheet: मुलाने ऑडिओत आपला आवाज दिला आहे. तो म्हणतो, "वडील पास होण्यासाठी वारंवार रागवत होते. आता मला त्यांची दहावीची मार्कशीट मिळाली आहे. ते सर्व विषयात नापास झाले आहे. पाहा, हे त्याचे मार्कशीट आहे."

बाबा मुलाला म्हणत होते, पास हो... मुलाने वडिलांची दहावीची मार्कशीट सोशल मीडियावर केली व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 2:53 PM

आई-वडील सातत्याने मुलांच्या अभ्यासासाठी मागे लागलेले असतात. मुलांना सारखे अभ्यास कर, अभ्यास कर…असे म्हणतात. मग काही मुले नाराजीने अभ्यास बसतात. काही ऐकतच नाही. परंतु एका मुलाने वडिलांचे सातत्याने अभ्यासाला मागे लागणे खटकले. त्याला त्याचा राग आला. मग त्याने वडिलांची दहावीचे गुणपत्रक शोधण्याची मोहीम सुरु केली. त्याला ते गुणपत्रक मिळाले. ते पाहताच त्याला समाधान झाले. त्याने ते गुणपत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले. त्या मार्कशीटमध्ये त्याचे वडील सर्व विषयात नापास झालेले दिसत आहेत. आता सोशल मीडियावर एखादा ट्रेंड बनावे, तशी ही मार्कशीट व्हायरल झाली आहे.

काय आहे ती पोस्ट

टि्वटरवर (X वर) @Desi Bhayo या अकाउंटवरुन मार्कशीट व्हायरल केली आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “पिता जी की मार्कशीट मिल गई”. त्यात मुलाने ऑडिओत आपला आवाज दिला आहे. तो म्हणतो, “वडील पास होण्यासाठी वारंवार रागवत होते. आता मला त्यांची दहावीची मार्कशीट मिळाली आहे. ते सर्व विषयात नापास झाले आहे. पाहा, हे त्याचे मार्कशीट आहे.”

हे सुद्धा वाचा

व्हिडिओमध्ये मिम्स दाखवण्यासोबत एका मुलाचा आवाज येत आहे. ही पोस्ट हजारो लोकांनी पाहिली आहे. हजारो जणांनी लाईक अन् शेअर केली आहे. त्यावर अनेक प्रकारच्या कॉमेंटही आल्या आहेत. एक युजर लिहितो, पास होऊन जा, नाहीतर उद्या तुमचा मुलगाही तुमची मार्कशीट शोधून अशी शेअर करेल.

दुसरा युजर म्हणतो, तुझे वडील फेल झाले म्हणून तू सुद्ध फेल होणार का? आणखी एक जण म्हणतो, त्यांचा निकाल खराब आला. त्यामुळे मुलगा चांगल्या गुणांनी पास व्हावे, चांगला सेटल व्हावे, ही त्यांची अपेक्षा असणार आहे. आणखी एक जण म्हणतो वडिलांचे नापास होणे म्हणजे आजचे सीबीएसईमधील ९० टक्के गुण आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....