राजकारणाचा पूर्ण अभ्यास, सुपरस्टार थलपती तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री! सभेला लाखोंच्या संख्येनं चाहते

विजय यांच्या रोखठोक भूमिकेमुळे आणि जनतेमधील प्रचंड लोकप्रियतेमुळे ते 2026 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून समोर येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांचे भाषण आणि कार्यक्रम आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

राजकारणाचा पूर्ण अभ्यास, सुपरस्टार थलपती तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री! सभेला लाखोंच्या संख्येनं चाहते
Thalapathy Vijay
| Updated on: Oct 29, 2024 | 3:50 PM

आता बरेच अभिनेते राजकारणाची वाट धरताना दिसतात. कोणी पक्षप्रवेश केला तर कोणी विधानसभेसाठी उमेदवारी मिळवली. अशातच आता अजून एक सुपरस्टार चर्चेत आला आहे ज्याची राजकारणात धमाकेदार एन्ट्री झालेली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय राजकारणात आपले नशीब आजमवायला सज्ज झाला आहे.

भव्य रॅली अन् धमाकेदार एन्ट्री

थलपती विजय याच्या राजकारणातील प्रवेशामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरु होती, मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. अखेर विजयने रविवारी राजकारणात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. भव्य रॅलीत त्याने जनतेला संबोधितही केलं. विजयने यावेळी आपले पहिलं राजकिय संमेलन घेतलं. पेहारावापासून ते आत्मविश्वासापर्यंत विजयची राजकीय शैली अगदी उठून दिसत होती.

Thalapathy Vijay

सभेला लाखोंच्या संख्येनं गर्दी

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. थलपती विजयने तमिलगा वेत्री कझगम (टीवीके) या राजकिय पक्षाची स्थापना केली आहे. विजयच्या भव्य परिषदेला लाखो लोकांनी हजेरी लावली. यावेळी सुमारे 2 लाख लोक उपस्थित होते, असं सांगितलं जात आहे.

Thalapathy Vijay

घटनास्थाळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तामिळनाडूच्या गृह विभागाने घटनास्थळी मोठी पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता. थलपती यांनीसुद्धा अगदी रोख-ठोक भूमिका मांडली केलं. हे चित्रपटाचं क्षेत्र नाही, उलट राजकारण हे युद्धक्षेत्र आहे असं म्हणत जोरदार भाषण केलं. थलपती विजय यांच्या दमदार भाषणानंतर चाहत्यांसह जनतेमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

“विजय तामिळनाडूचा पुढील मुख्यमंत्री होईल”

TVK पक्षाच्या कार्यक्रमासाठी दूर ठिकाणहून लोक आले होते. या परिषदेसाठी आलेले मदुराई येथील आयटी व्यावसायिक उदयकुमार यांनी आयएएनएसला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “विजयचा राजकारणात प्रवेश तामिळनाडू आणि तेथील लोकांसाठी चांगला आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्याने चांगला गृहपाठ केला आहे आणि 2026 च्या विधानसभा निवडणुका हे त्याचं लक्ष्य आहे. मला आशा आहे की, तो तामिळनाडूचा पुढील मुख्यमंत्री होईल”.

Thalapathy Vijay

एकंदरीतच विजय यांची लोकांमधील क्रेझ पाहता तसेच त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे ते पुढील मुख्यमंत्री होण्याची शक्यता अजून वाढली आहे.