AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला, जयसिद्धेश्वर शिवाचार्यांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड

सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य (BJP MP Jay Siddeshwar Shivachrya caste certificate issue) हे आपली खासदारकी वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत.

प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला, जयसिद्धेश्वर शिवाचार्यांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 27, 2020 | 3:11 PM
Share

सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य (BJP MP Jay Siddeshwar Shivachrya caste certificate issue) हे आपली खासदारकी वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरविलं आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. मात्र आता खासदार महोदयांनी जात प्रमाणपत्रासंदर्भात वेगळीच तक्रार दिली आहे. BJP MP Jay Siddeshwar Shivachrya caste certificate issue)

अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार, खासदारांनी केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासदारांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याआधीच आता जातीचा दाखला हरविल्याची तक्रार देण्यात आली आहे.

9 तारखेला प्रवासादरम्यान दाखल हरवला असून, या संदर्भात 14 तारखेला पोलिसात खासदारांच्या नावाने तक्रार अर्ज दाखल केला आहे. 15 फेब्रुवारीला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत जातपडताळणी समिती समोर अंतिम सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खासदारांच्या वकिलांनी दाखला उच्च न्यायालयात असल्याची माहिती दिली होती. अंतिम सुनावणीच्या आदल्यादिवशी तक्रार दिल्याने, या प्रकरणातील गुंता आणखीन वाढला आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (Solapur Mp Jay Siddheshwar Swami in trouble) यांचं जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी आता धोक्यात आली आहे. (Solapur Mp Jay Siddheshwar Swami in trouble)

सोलापूर लोकसभा निवडणूक

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते.

संबंधित बातम्या 

भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना धक्का, जातीचा दाखला रद्द, खासदारकी धोक्यात

महाराष्ट्रातील भाजप नेत्यावर खासदारकी रद्द होण्याची टांगती तलवार

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?