Eknath Khadse : जिल्हा दूध संघात एक रुपायाची गैरव्यवहार नाही, विरोधकांचा दुसरा डावही फसला, खडसेंचा दावा

| Updated on: Aug 21, 2022 | 6:23 PM

जिल्हा दूध संघामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संचालक मंडळाला अडचणीत आणण्यासाठी हेतपुरस्कर हे उद्योग सुरु आहे, असे म्हणत नाव न घेता एकनाथ खडसेंनी भाजपवर निशाना साधला. शिंदे सरकारच्या माध्यमातून, तसेच प्रशासन मंडळाच्या सहाय्याने जिल्हा दूध संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Eknath Khadse : जिल्हा दूध संघात एक रुपायाची गैरव्यवहार नाही, विरोधकांचा दुसरा डावही फसला, खडसेंचा दावा
Follow us on

जळगाव : (District Milk Union) जिल्हा दूध संघामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, यामध्ये तथ्य नसल्याचा दावा (Eknath Khadse) आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे. यामध्ये एक रुपायाचाही अपहार झाला नाही, जिल्हा दूध संघाला बदनाम करण्याचा (Opponent’s innings) विरोधकांचा डाव असल्याचा आरोप आता खडसे यांनी केला आहे. जिल्हा बॅंकेत काही मिळाले नाही म्हणून आता जिल्हा दूध संघाला टार्गेट केले जात आहे. पण यामध्ये कितीही चौकशी केली तरी निष्पन्न काहीच होणार नाही. जिल्हा दूध संघाची घौडदौड रोखण्याचा प्रयत्न विरोधकांचा असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

दूध उत्पादकांसमोर संघाचा कारभार

जिल्हा दूध संघामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संचालक मंडळाला अडचणीत आणण्यासाठी हेतपुरस्कर हे उद्योग सुरु आहे, असे म्हणत नाव न घेता एकनाथ खडसेंनी भाजपवर निशाना साधला. शिंदे सरकारच्या माध्यमातून, तसेच प्रशासन मंडळाच्या सहाय्याने जिल्हा दूध संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी दूध संघाचा कारभार पाहिला आहे. तो जास्तीत जास्त पारदर्शी पध्दतीने करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने केला असल्याचे, कारभारावर माझे लक्ष होते, असेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले.

संघाच्या अध्यक्षपदी मंदाकिनी खडसे

जिल्हा दूध संघाच्या कारभारात अध्यक्षा मंदाकिनी खडसे व त्यांचे संचालक मंडळाने गैरव्यवहार केल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचाऱ्याने शासनाकडे केली होती. त्या तक्रारीवरुन शिंदे सरकारकडून चौकशी समिती देखील समिती देखील नियुक्त करण्यात आली होती. दरम्यान चौकशीत दहा कोटी रुपयांचा निधी शासनाची कुठलीही परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत उघड झाल्याने संचालक मंडळ विरुद्ध कारवाई करण्याचे शासनाचे उपसचिव नि.भा. मराळे यांनी विभागीय सह निबंधकांना दिले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रशासक मंडळही संशयास्पद

जिल्हा दूध संघावर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक मंडळावरही एकनाथ खडसेंनी निशाना साधला आहे, प्रशासक मंडळातील सदस्यांपैकी निम्मे सदस्य असे आहेत ज्यांचा कुठलाही डेअरीचे सदस्य, दूधाची काही संबंध नाही, मात्र संचालक मंडळाला बदनाम करण्याचं कटकारस्थान चालंल आहे. कुणीही यावं, तपासणी करावी, दोषी असेल तर शासन शिक्षा करेन, अस आव्हान सुध्दा यावेळी एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिलं आहे.