AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election 2022 Ward No 20 | शिंदेसेना ठरणार का वरचढ की शिवसेना देणार टशन? जिंकणे हेच सर्वांचे मिशन

TMC Election 2022 Ward No 20 | यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत घोडा आणि मैदान आमने सामने आहेत. आता कोण बाजी मारतं त्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

TMC Election 2022 Ward No 20 | शिंदेसेना ठरणार का वरचढ की शिवसेना देणार टशन? जिंकणे हेच सर्वांचे मिशन
कोण मारणार बाजी? सत्तेसाठी कोण राजी?Image Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 06, 2022 | 5:15 PM
Share

TMC Election 2022 Ward No 20 | राज्यात गेल्या महिन्यातील नाट्यमय घडामोडीनंतर सत्तांतर (Change of Government) घडून आले. शिंदे गटासह भाजप सत्तेत सहभागी झाला आहे. ठाणे हा शिवसेनेचा (Shiv Sena) बाल्लेकिल्ला होता. मात्र शिवसेनाला ठाण्यातूनच पहिला सुरुंग लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांची मोट बांधत राज्यात सत्तांतर घडवून आणले. या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत आहे. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकीची तयारी राजकीय पक्ष करत आहेत. ठाणे महापालिकेत (TMC Election 2022) प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी लगबग झाल्यानंतर आता तिकीटासाठी इच्छुकांची फिल्डिंग लागली आहे. पक्ष नेते ही सक्रिय झाले असून जास्तीत जास्त नगरसेवक (Corporator) निवडून आणण्यासाठी पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना आणि शिंदे सेना यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीने ही निवडणुकीसाठी कंबर कसली असून मनसे, काँग्रेस आणि अपक्ष ही या निवडणुकीत दावेदार आहेत.

ठाण्यातील (Thane) इच्छुक नगरसेवकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ठाणे महापालिकेच्या (Thane municipal corporation election 2022) वॉर्ड क्रमांक 20 मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन दिली आहेत. तर काही उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तसेच वॉर्डात ही भेटीगाठी सुरु झाल्या असून निवडून दिल्यावर नागरी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्या जात आहे. कॉर्नर बैठकांचे सत्र ही सुरु झाले आहे. निवडणुकीचा खर्चासहित इतर गणितं मांडण्यात येत असून निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

ठाणे महापालिका आरक्षण

ठाणे महापालिका निवडणुकीत एकूण 142 जागांवर निवडणूक होत आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या एकूण 10 जागा असून त्यातील 5 जागांवर महिला उमेदवार नशीब आजमावतील. अनुसूचित जमातीसाठी 3 जागा असून त्यातील 2 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण 15 जागा राखीव असून त्यातील 8 जागांवर महिला उमेदवार नशीब आजमावतील. तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी एकूण 114 जागा असून त्यातील 56 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. या निवडणुकीत सर्व मिळून एकूण 71 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.

आरक्षण सोडतनुसार  बदल

वार्ड क्रमांक 20 (अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला वार्ड क्रमांक 20 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 20 (क) सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 20 लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 42089 अ.जा. – 1581 अ. ज. – 922

प्रभागात समाविष्ट परिसर

सिद्धेश्वर तलाव, रमाबाई आंबेडकर नगर, रुणवाल नगर, बी. कोलबाड, ब्रम्हाळा तलाव, गोकुळदास नगर, सिंगनगर, शेलारपाडा, गणेशवाडी, आदी परिसराचा या प्रभागात समावेश होतो.

विजयी उमेदवार, वार्ड क्रमांक 20 (2017)

प्रभाग क्रमांक 20 (अ) – मालती पाटील (शिवसेना) प्रभाग क्रमांक 20 (ब) – शर्मिला गायकवाड (पिंपळोकर)(सेना) प्रभाग क्रमांक 20 (क) – नम्रता पमनानी (शिवसेना) प्रभाग क्रमांक 20 (ड) – भरत चव्हाण (भाजप)

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर
पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर
पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
इतर
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.