TMC Election 2022 Ward 29 : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाकरेंची सेना कमकुवत! आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये अस्तित्वाची लढाई

| Updated on: Aug 19, 2022 | 9:49 PM

आजवर शिवसेनेची राहिलेली ठाणे महानगरपालिका शिवसेनेतच दोन गट पडल्यानं आता कुणाच्या ताब्यात जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, ठाणेकर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार की उद्धव ठाकरेंनाच साथ देणार हे पाहावं लागणार आहे.

TMC Election 2022 Ward 29 : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाकरेंची सेना कमकुवत! आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये अस्तित्वाची लढाई
Follow us on

ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं. त्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. विशेषत: या बदलाचा मोठा परिणाम ठाण्याच्या राजकारणात दिसून येतोय. कारण ठाणे महापालिकेतील (Thane Municipal Corporation) काही अपवाद वगळता बहुतांश नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आजवर शिवसेनेची राहिलेली ठाणे महानगरपालिका शिवसेनेतच दोन गट पडल्यानं आता कुणाच्या ताब्यात जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, ठाणेकर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार की उद्धव ठाकरेंनाच साथ देणार हे पाहावं लागणार आहे.

मागील निवडणुकीत कोणते उमेदवार विजयी?

2017 च्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 29 मधील वार्ड क्र. 29 (अ) मध्ये बाबाजी बलराम पाटील, वार्ड क्र. 29(ब) मधून सुरमे नादिरा यासीन आणि वार्ड क्र. 29 (क) मधून पाटील सुलोचना हिरा हे विजयी झाले होते.

यंदाचं आरक्षण काय?

प्रभाग क्रमांक 29 मधील वार्ड क्र. 29 (अ) अनुसूचित जाती महिला, वार्ड क्र. 29 (ब)मध्ये अनुसूचित जमाती महिला तर वार्ड क्र. 29 (क)मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात आता इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

प्रभागातील मतदारांची संख्या किती?

2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग क्रमांक 29 मध्ये 38 हजार 422 मतदार आहेत. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदारांची संख्या 4 हजार 701 तर, अनुसूचित जमाती प्रवर्गातील मतदारांची संख्या 2 हजार 411 इतकी आहे.

प्रभागाचे नाव व व्याप्ती :

चेंदनी (पूर्व आणि पश्चिम) खारटन रोड, खारकर, आळी, महागिरी

उत्तर : उथळसर रोडवरील समाधान हॉटेलपासून पूर्वेकडे रस्त्याने कोर्ट नाक्यापर्यंत, त्यानंतर पूर्वकडे जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने हुतात्मा अनंत कान्हेरे चौकापर्यंत, त्यानंतर दक्षिणेकडे क्रीक रोडने पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत, त्यानंतर पूर्वेकडे कळवा खाडीपर्यंत.

पूर्व : कळवा खाडीपासून दक्षिणेकडे रेल्वे ट्रॅकपर्यंत त्यानंतर पश्चिमेकडे रेल्वे ट्रॅकने खाडीच्या काठापर्यंत (सुदर्शन कॉलनीच्या मागे) आणि त्यानंतर कळवा खाडीच्या काठाने सुदर्शन कॉलनी पासून मिठबंदर रस्त्यापर्यंत

दक्षिण : कळवा खाडीपासून मिठबंदर रोडने अष्टविनायक चौकापर्यंत त्यानंतर रामभाऊ म्हाळगी रोडने लक्ष्मी निवास को. ऑप. हौ.सो. (पूर्व) पर्यंत

पश्चिम : रामभाऊ म्हाळगी रोडवरील लक्ष्मी निवास को. ऑप. हौ.सो. (पूर्व) पासून उत्तरेकडे रेल्वे ट्रॅकपर्यंत (न्यू इंदिरानगर कॉलनीच्या मागे) तदनंतर हरियाली तलावापर्यंत त्यानंतर रेल्वे ट्रॅक ओलांडून लक्ष्मी निवास (पश्चिम) त्यानंतर रस्त्याने दत्त मंदिरापर्यंत त्यानंतर दत्त मंदिराकडून रस्त्याने पश्चिमेकडे नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्यापर्यंत त्यानंतर उत्तरेकडे नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्याने गणपती मंदिर पर्यंत आणि त्यानंतर रस्त्याने पश्चिमेकडे अग्यारी लेनपर्यंत त्यानंतर लिली अपार्टमेंट/यशोमंदिर आणि गौतमलब्धी / चोंडकर बिल्डींगच्या मधून यशोमंदिर समोरील रस्त्यापर्यंत तदनंतर पर्यंत. ईशान्येकडे रस्त्याने वाडिया हॉस्पिटलपर्यंत तदनंतर उथळसर रस्त्याने समाधान हॉटेलपर्यंत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर