Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे फार काही वेगळे काम नाही करत… समीर वानखेडेंचे विधान चर्चेत

Tukaram Mundhe: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये समीर वानखेडे यांना तुकाराम मुंढे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसत आहे. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे फार काही वेगळे काम नाही करत... समीर वानखेडेंचे विधान चर्चेत
Sameer Wankhede
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 7:29 AM

राज्यातील अनेक प्रामाणिक आणि सडेतोड भूमिका घेणारा अधिकारी गाजले आहेत. पण सध्या असे काही बोटावर मोजणारेच अधिकारी उरलेत हे लोकांना समजले आहे. त्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे नाव घेतले जाते. त्यांचा कारवाई करण्याचा बेधकपणा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचा कारभार त्यांनी हाती घेतल्यापासून भेसळखोरांची झोपच उडाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी मुंबई प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘तुकाराम मुंढे फार काही असाधारण काम करत नाहीयेत’ असे म्हटले आहे.

काय म्हणाले समीर वानखेडे?

समीर वानखेडे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले की, हे बघा मी काही अधिकाऱ्यांविषयी खासगी बोलणार नाही. हा आमच्या कामाचा भाग आहे. मी जे काही करत आहे किंवा ते जे अधिकारी आहेत ज्यांच तुम्ही नाव घेताय कोणीही चौकटीबाहेर जाऊन काम करत नाहीये. हे आमचे काम आहे. राष्ट्राच्या प्रती आमची जबाबदारी आहे आणि खरं तर आम्हाला त्यासाठी पगार मिळतो. त्यामुळे आम्हाला सर्वांना जवळपास सारखेच काम करावे लागते. त्यामुळे कोणी तरी असे काही ग्रेट काम करत नाहीये. आमच्या समोर जो मुद्दा आहे ड्रग्जचा आम्हाला त्याला सामोरे जावे लागेल. आम्हाला ते थांबवावे लागणार. नाही तर याचा परिणाम नव्या पिढीवर, तरुणांवर होईल.

वाचा: धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंडेंना सरकारकडून किती पगार मिळतो?

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर समीर वानखेडे यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तुकाराम मुंढे यांना पाठिंबा दिला आहे. एका यूजने, ‘पण ते ज्या प्रकारे काम करत आहे तशाच प्रकारे काम झाले पाहिजे’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, हा सर्वात प्रामाणिक अधिकारी आहे असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने, ते बरोबर आहेत. ते भ्रष्टाचारी अधिकारी नाहीत. त्यांना आमचा सलाम. असेच प्रामाणिक अधिकारी नेहमीच इतरांपेक्षा वेगळे असतात.

२१ वर्षांत २५ वेळा झाल्या बदल्या

अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, ते केवळ त्यांच्या छापेमारीमुळे चर्चेत नाहीत तर त्यांचा करिअरचा ग्राफ देखील लक्ष वेधून घेत आहे. २१ वर्षांच्या सेवेत त्यांची २५ वेळा बदली झाली आहे. ही संख्या त्यांच्या ओळखीचा तितकाच महत्त्वाचा भाग बनली आहे, जितके त्यांचे काम.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us