“पुढचा मोर्चा आझाद मैदानात!”, उदयनराजे यांची घोषणा

| Updated on: Dec 03, 2022 | 12:25 PM

उदयनराजे आक्रमक...

पुढचा मोर्चा आझाद मैदानात!, उदयनराजे यांची घोषणा
Follow us on

रायगड : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर सर्वत्र त्याचे तीव्र पडसाद उमटले. खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी ते वारंवार करत आहेत. आज रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा त्यांनी घेतला. यावेळी बोलताना त्यांनी पुढच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. पुढचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याचं उदयनराजेंनी (Udayanraje Bhonsle) जाहीर केलंय.

“राज्यपालपदावर विराजमान असलेली व्यक्ती जर असं वक्तव्य करत असेल तर शिवरायांचा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. आझाद मैदान लांब नाही. एक तारीख ठरवून मुंबईच्या आझाद मैदानावर जायचं. तेव्हा तयारीला लागा”, असं म्हणत उदयनराजेंनी पुढच्या मोर्चाची घोषणा केली आहे.

“शिवाजी महाराजांचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासाखा दिवस आहे. महाराजांच्या सन्मानासाठी इथून पुढेही आपल्याला लढा द्यायचा आहे. आता पुढची लढाई आझाद मैदानावर”, असं उदयनराजे म्हणालेत.

केवळ शिवाजी महाराजच नाही तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा अवमान राज्यपालांनी केला आणि अपमान पाहत बसलो आहोत. महाराजांचा अवमान हा आपला अपमान वाटत नाही का? आपण काही करणार आहोत की नाही? या राजकारण्यांच्या किती दिवस तावडीत राहणार? आज हा देश विकृत लोकांच्या तावडीत गेला. हे सांगताना खंत वाटते, असं म्हणत उदयनराजेंनी आपल्या वेदना बोलून दाखवल्या.