फडणवीस सरकारकडे ‘विल’ आहे, म्हणून मराठ्यांना आरक्षण : उदयनराजे

सातारा : “इंग्रजीत एक म्हण आहे, व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे (इच्छ असेल, तर मार्ग दिसेल). मला वाटतंय, या सरकारकडे विल आहे, म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांना वेग मिळतोय.” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारचे कौतुक केले. ते साताऱ्यातील कार्यक्रमात […]

फडणवीस सरकारकडे विल आहे, म्हणून मराठ्यांना आरक्षण : उदयनराजे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

सातारा : “इंग्रजीत एक म्हण आहे, व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे (इच्छ असेल, तर मार्ग दिसेल). मला वाटतंय, या सरकारकडे विल आहे, म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांना वेग मिळतोय.” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारचे कौतुक केले. ते साताऱ्यातील कार्यक्रमात बोलत होते.

सातारा जिल्ह्याच्या विविध विकास कामांसाठी 10 हजार कोटींच्या कामांचे भूमीपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेही उपस्थित होते.

उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

“मराठा आरक्षणासंदर्भात बोलायचं झालं तर अत्यंत धाडसी निर्णय या सध्याच्या सरकारने घेतलेला आहे. या संदर्भात याआधी केवळ घोषणा झाल्या. मराठा आरक्षणाचा निर्णय मागेच मार्गी लागायला पाहिजे होता. पण का लागला नाही, माहित नाही. पण इच्छाशक्ती असेल, तर आपण काहीही करु शकतो. इंग्रजीत एक म्हण आहे, व्हेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे (इच्छ असेल, तर मार्ग दिसेल). मला वाटतंय, या सरकारकडे विल आहे, म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांना वेग मिळतोय.” असे उदयनराजे भोसले म्हणाले.

राष्ट्रावादीच्या खासदाराकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, बाहेर कार्यकर्त्यांचं विरोध

सातारा जिल्ह्याच्या विविध विकासकामांसाठी 10 हजार कोटींच्या कामांचे भुमी पुजन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेही उपस्थित होते. विशेष म्हणजे, यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी सभा मंडपाच्या बाहेर रस्त्यावर गाजर वाटप करुन निषेध व्यक्त केला. साताऱ्याच्या जनतेला 10 हजार कोटीचे गाजर दाखवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेतले.

पाहा व्हिडीओ :