पार्थ पवार आणि अमोल कोल्हेंसाठी उदयनराजे मैदानात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारंसघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे जाहीर सभा घेणार आहेत. उद्या म्हणजे 13 एप्रिल रोजी पुण्यातील निगडी येथे उदयनराजे भोसले यांची सभा होणार आहे. महापौर निवास मैदानात सभेचं आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री […]

पार्थ पवार आणि अमोल कोल्हेंसाठी उदयनराजे मैदानात
Follow us on

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारंसघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे जाहीर सभा घेणार आहेत.

उद्या म्हणजे 13 एप्रिल रोजी पुण्यातील निगडी येथे उदयनराजे भोसले यांची सभा होणार आहे. महापौर निवास मैदानात सभेचं आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी राजकीय एन्ट्री घेत थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टक्कर देण्यासाठी थेट अभिनेते अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवले आहे. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि थेट शिरुरमधून तिकीटही मिळवलं.

मावळमधून पार्थ पवार आणि शिरुरमधून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने दोन्ही ठिकाणच्या लढती रंगतदार होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी कायम पराभूत होत असे. मात्र, यावेळी तगडे उमेदवार दिल्याने निवडणूक चुरशीची ठरणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ आणि शिरुरमधील प्रचारही धडाक्यात सुरु केला आहे.

मावळ आणि शिरुर या दोन्ही मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेना बाजी मारते की राष्ट्रवादी, हे 23 मे रोजीच स्पष्ट होईल.