Udhav Thackeray: तर मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो, उद्धव ठाकरेंचं शिवसेना आमदारांना राजीनाम्यावर थेट भावनिक आव्हान

| Updated on: Jun 22, 2022 | 6:15 PM

या फेसबुक लाईव्हनंतर मी माझा मुक्काम वर्षा या शासकीय बंगल्यावरून मातोश्रीवर हलवत आहे, अशी घोषणा केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना राजीनाम्यावर थेट भावनिक आवाहन केलं आहे.

Udhav Thackeray: तर मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो, उद्धव ठाकरेंचं शिवसेना आमदारांना राजीनाम्यावर थेट भावनिक आव्हान
तर मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो, उद्धव ठाकरेंचं शिवसेना आमदारांना राजीनाम्यावर थेट भावनिक आव्हान
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे (Cm Uddhav Thackeray Facebook Live) सध्याच्या राजकीय घडामोडींबाबात तर भाष्य केलंच आहे. मात्र या फेसबुक लाईव्हनंतर मी माझा मुक्काम वर्षा या शासकीय बंगल्यावरून मातोश्रीवर (Matoshree banglow) हलवत आहे, अशी घोषणा केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना राजीनाम्यावर थेट भावनिक आवाहन केलं आहे. आज आपल्या फसबुक लाईव्हद्वारे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आज मी नेमकं काय बोलणार मला दुख कशाचं झालं आश्चर्य कशाचं वाटलं दुखं कशाचं वाटलं, तर  काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली असती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर ठिक होतं. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहे. त्याचा विचार आहे. सत्तेसाठी आपण एकत्रं आलो. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. काल पवारांनी फोन केला. आम्ही तुमच्यासोबत आहे. त्यांनी भरोसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत असतील मी मुख्यमंत्री नको. ते मला माझं मानता की नाही माहीत नाही. तुम्ही इथं येऊन का बोलले नाही. माझ्यासमोर बोलायला हवं होतं, असेही मुख्यमंत्री म्हणले.

मी मुक्काम मातोश्रीवर हलवतो

तसेच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे. तुम्ही नकोत. मला एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पद नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही, असे भावनिक आवाहन करताना ते दिसून आले. आजच मी मातोश्रीवर मुक्काम हलवणार आहे. मला सत्तेचा मोह नाही. असे म्हणत तुम्ही हे कशाला करत आहात. त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे? असे अनेक सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहेत.

मी खुर्चीला चिपकून बसणार नाही

बांधवांनो पद येतात आणि जात असतात. आयुष्याची कमाई काय तुम्ही जे काही काम करता. त्यातून जनतेची जी प्रतिक्रिया असते ती खरी कमाई असते. या अडीच वर्षात जे तुम्ही मला प्रेम दिलं. कुठे झाली हो आपली भेट. याच माध्यमातून आपण बोलत आलो. अनेकांनी सांगितलं. उद्धवजी तुम्ही बोलता तेव्हा कुटुंबातील माणूस बोलतोय असं वाटतं असं मला अनेकांनी सांगितलं. हे भाग्य मला नाही वाटत परत मिळेल. ज्यांची ओळख पाळख नाही, दूर कुठे तरी रहातता. मुंबईत राहिले तरी भेटीचा योग नसतो. तेव्हा याच माध्यमातून बोलल्यावर तुम्ही स्तुती करता ही आयुष्याची कमाई आहे. मुख्यमंत्रीपद अनपेक्षितपणे आलं. आता मी या पदाला चिपकून बसत नाही. तुम्ही सांगा मी पायउतार होतो. तुम्ही म्हणाल हे नाटक आहे. हे अजितबात नाटक नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बजावलं आहे.

माझ्याविरोधात एकानेही मतदान करणं लाजीरवाणं

संख्या किती कुणाकडे आहे. गौण विषय आहे. शेवटी ही लोकशाही आहे. ज्याच्याकडे संख्या अधिक तो जिंकतो. ती संख्या तुमम्ही कशी जमवता. प्रेमाने जमवता, जोरजबरदस्तीने की दटावण्या देऊन जमवता हे नगण्य असतं. समोर उभं केल्यावर डोकी मोजली जातात आणि अविश्वास ठराव मंजूर किंवा नामंजूर होतात. मी ज्यांना मानतो किंवा मला जे मानतात त्यापैकी किती जण तिकडे गेले किती जण माझ्याविरोधात मतदान करतील, नाही. एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं तरी ती माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणून मला एकही मत माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ येऊ देणार नाही. तुम्ही मला सांगा मी मुख्यमंत्रीपद सोडलं. मी माझं मन घट्ट करून बसलो आहे. मुख्यमंत्रीपदी राहायची माझी अजिबात इच्छा नाही. हे प्रेम असंच ठेवा. एवढं बोलतो जय महाराष्ट्र, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधन आटोपलं आहे.