मोदी यांच्याकडून धर्मकांड, सोहळ्याला हिंदुत्व म्हणावे की राज्याभिषेक सोहळा?; दैनिक ‘सामना’तून सवाल

| Updated on: May 29, 2023 | 8:20 AM

नेहरूंच्या काळात संसदेचं कामकाज वर्षाला 140 दिवस चालत होते. आता तर 50 दिवसही चालत नाही. मग न चालवल्या जाणाऱ्या संसदेसाठी एक हजार कोटींचा भव्य महाल कशासाठी? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

मोदी यांच्याकडून धर्मकांड, सोहळ्याला हिंदुत्व म्हणावे की राज्याभिषेक सोहळा?; दैनिक सामनातून सवाल
new parliament building
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : नव्या संसदेच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या उजव्या बाजूला सेंगोलचीही प्रतिष्ठापणा करण्यात आली. या सोहळ्यावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला होता. या सोहळ्यातून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनाही डावलण्यात आले होते. इतर राज्यांचे राज्यपालही या सोहळ्यात दिसले नाहीत. या सोहळ्यात हवन करण्यात आलं. त्यावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. मोदींनी या सोहळ्यात धर्मकांड केलं. त्यामुळे या सोहळ्याला हिंदुत्व म्हणावे की राज्याभिषेक सोहळा? असा सवाल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

कालचा संसदेच्या उद्घाटनाचा सोहळा म्हणजे सब कुछ मोदी असाच होता. सोहळ्या दरम्यान फोटो किंवा चित्रीकरणात मोदींनी दुसऱ्या कुणाचीही सावली येऊ दिली नाही. मोदींचा तो स्वभावच आहे. राष्ट्रपतींनी या संसदेचे उद्घाटन केले असते. फोटोत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते दिसले असते तर मोदींचं महत्त्व कमी झालं नसतं. पण आपला स्वभाव बदलतील ते मोदी कसले? मोदी हे मोदींसारखेच वागतात. तसेच वागले, अशी खोचक टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

आठ वर्षात संसदेला टाळे

2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी संसदेसमोर कसे डोके टेकवले होते आणि कसे अश्रू ढाळले होते याची आठवण करून देत अग्रलेखातून मोदींवर खरपूस टीका करण्यात आली आहे. संसदेचे पावित्र्या राखीन, सर्वांना समान न्याय देईन म्हणणाऱ्या मोदींनी आठ वर्षात संसदेस टाळे ठोकले. आपल्या मर्जीने नव्या संसदेची इमारत उभी केली. एखाद्या महाराजाने आपल्या राजमहालाचा वास्तुप्रवेश करावा तसाच उद्घाटनाचा सोहळा होता, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

राज्याभिषेक सोहळा

नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यातून ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांना फाटा देऊन अंधश्रद्धा, धर्मकांडाला महत्त्व देण्यात आलं. राजदंडही आला. म्हणजे यापुढे राजेशाहीची सुरुवात झाली. दिल्लीत लोकशाहीच्या नावाखाली नव्या बादशाहीचा राजदंड पोहोचला. विज्ञान आणि संशोधन न मानणाऱ्या लोकांच्या गराड्यात मोदी आले. त्यांनी धर्मकांड केले. त्याला हिंदुत्व म्हणावे की राज्याभिषेक सोहळा? असा सवाल अग्रलेखातून करणअयात आला आहे.

राष्ट्रपतींना आमंत्रण नाही, साधूंना कशाला?

हिंदुत्वात श्रद्धा आहे. अंधश्रद्धा नाही. भारतीय संसदेचे कोणते रुप आपण जगाला दाखवत आहोत? राष्ट्रपतींना आमंत्रण नाही. पण साधूंना आमंत्रण देणअयात आलं. एक हजार कोटींचा महाल लहरी राजाच्या इच्छेखातर बनवण्यात आला. त्यातून लोकशाही हद्दपार झाली, अशी इतिहासात नोंद होईल, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.