धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

शनिवारी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवत निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
| Updated on: Oct 09, 2022 | 8:25 AM

मुंबई : शनिवारी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवत निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाला (Eknath Shinde) मोठा धक्का देण्यात आला आहे.  निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता ठाकरे गट आणि शिंदे गट यांना धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक धनुष्यबाण या चिन्हाविनाच लढवावी लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटाला वापरता येणार नाहीये. यावरून आता ऐकोंमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो शेअर करत, जिंकून दाखवणारच असा एल्गार केला आहे. चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान दुसरीकडे चिन्ह गोठवण्यात आल्यानं आता अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या पोटनिवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

सोमवारी चिन्हांची निवड

निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळं आता दोन्ही गटाला अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाहीये. त्यामुळे या निवडणुकीसाठी आता दोन्ही गटाला सोमवारी मुक्त चिन्हांमधल्या 3 चिन्हांची निवड करून ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागणार आहेत.