Chirag Paswan: मला लाज वाटते… केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे विधान चर्चेत, असे का म्हणाले?

Chirag Paswan: एलजेपीचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता ते नेमकं असं का म्हणाले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Chirag Paswan: मला लाज वाटते... केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे विधान चर्चेत, असे का म्हणाले?
chirag paswan
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 9:04 AM

गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये महिलांवार अत्याचार होण्याच्या घटना सतत वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशभरात तेथील प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. आता या सगळ्यावर एनडीए सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या एलजेपीचे (राम विलास) नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बिहार सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी थेट, “मला लाज वाटते की मी अशा सरकारला पाठिंबा देत आहे, जिथे गुन्हेगारी पूर्णपणे बेबंद झाली आहे” असे म्हटले आहे.

बिहारमध्ये बिघडत चाललेली कायदा-व्यवस्था याबाबत आता बिहार सरकारमध्ये असलेले लोक देखील प्रश्न उपस्थित करत आहेत. चिराग पासवान बिहारमधील अलीकडील घटनांबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. त्यावेळी त्यांनी कायदा-व्यवस्थेबाबत आपली नाराजी व्यक्त केली आणि सरकारकडे यावर तात्काळ लगाम घालण्याची मागणी केली.

पोलिस-प्रशासनावर गंभीर आरोप

चिराग पासवान यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, “पोलिस-प्रशासन पूर्णपणे निकामी झाले आहे आणि आता त्यांच्या कुवतीत नाही की बिहार आणि बिहारवासीयांना सुरक्षित ठेवणे. अशा परिस्थितीत मी पुन्हा एकदा बिहार सरकारला आग्रह करेन की, वेळीच यावर कारवाई करणे आवश्यक आहे.” त्यांनी अत्यंत स्पष्ट अंदाजात म्हटले की, “मला या गोष्टीचे दुःख होते की मी अशा सरकारला पाठिंबा देत आहे, जिथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. नाहीतर या पद्धतीने बिहार आणि बिहारवासीयांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार बिहारला खूप वाईट परिणामांकडे नेईल.”

बिहारमध्ये सातत्याने वाढत आहे गुन्हे

गेल्या काही दिवसांत जमुईमध्ये एका तरुणीसोबत ज्या प्रकारे उघडपणे छेडछाड आणि तिच्यासोबत वाईट वागणूक केली, त्याबाबत संपूर्ण देशात संताप दिसून आला होता. त्यानंतर समस्तीपूर आणि बांकामध्येही मुली व महिलांसोबत छेडखानीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एवढेच नाही तर गेल्या एका आठवड्यात राजधानी पटनामध्ये दोन ठिकाणी बदमाशांनी उघडपणे फायरिंग करून दोन व्यक्तींवर प्राणघातक हल्ला करत दहशत पसरवली. यात २३ सप्टेंबरला माजी नगरसेवक अनिल यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ऑटोमोबाइल वर्कशॉपच्या मालकावर सलग गोळ्या झाडून त्यांना जखमी करण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us