अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे मीडियाशी संवाद साधणार; ‘करारा जवाब’ देणार?

| Updated on: Aug 25, 2021 | 1:04 PM

संगमेश्वर ते महाडपर्यंत रंगलेल्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधणार आहेत. (Narayan Rane)

अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे मीडियाशी संवाद साधणार; करारा जवाब देणार?
केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us on

मुंबई: संगमेश्वर ते महाडपर्यंत रंगलेल्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी ते मीडियाशी बोलणार असल्याने राणे ठाकरे सरकारला ‘करारा जवाब’ देणार का?, राणेंच्या रडारवर आज कोण असणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Union Minister Narayan Rane to hold PC at 4pm at Adhish residence Juhu)

नारायण राणे आज दुपारी 4 वाजता जुहु येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी राणे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेतून राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राणे यावेळी काही नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा आहे. या शिवाय राणे जन आशीर्वाद यात्रेच्या पुढील कार्यक्रमाबाबतही बोलणार असल्याचं सांगितलं जातं. सिंधुदुर्गात संचारबंदी लागू करण्यात आल्याने सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रा होणार की नाही? असा सवाल केला जात आहे. त्यावर राणेंच्या आजच्या पत्रकार परिषदेतून उत्तर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन ट्विट चर्चेत

राणेंना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर दोन ट्विट सध्या चर्चेत आहेत. एक म्हणजे खुद्द नारायण राणे यांचं आणि दुसरं म्हणजे नितेश राणे यांचं. राणेंनी ट्विट करून सत्यमेव जयते, असं म्हटलं आहे. तर, नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या राजनीती सिनेमातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात मनोज वाजपेयी करारा जवाब मिलेगा, असं म्हणताना दिसत आहेत. नितेश राणे यांनी हे ट्विट करून ठाकरे सरकारला सूचक इशारा दिल्याचं बोललं जात आहे.

 

औकात कळली?

काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचे मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली?, असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून केला आहे.

 

काल काय घडलं?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. त्यानंतर राणेंविरोधात नाशिक, महाड, पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून महाड पोलिसांकडे सुपुर्द केलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. (Union Minister Narayan Rane to hold PC at 4pm at Adhish residence Juhu)

 

संबंधित बातम्या:

फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर पलटवार

वकिलांची टीम राणेंच्या घरी, सर्व खटले रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार

राणेंच्या अटकेसाठी थेट पोलिसांशी संवाद, अनिल परब अडचणीत येणार?; चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं विधान

(Union Minister Narayan Rane to hold PC at 4pm at Adhish residence Juhu)