AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरात असतानाच घराला बॉम्बने उडवण्याची धमकी, मोठी खळबळ, एकाला अटक

नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी ही देण्यात आलीये. ज्यानंतर खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे नितीन गडकरी हे नागपूरमध्ये असताना हा धमकीचा फोन आला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरात असतानाच घराला बॉम्बने उडवण्याची धमकी, मोठी खळबळ, एकाला अटक
| Updated on: Aug 03, 2025 | 1:41 PM
Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडवण्याची धमकी ही देण्यात आलीये. यामुळे मोठी खळबळ उडाली. गडकरींच्या घराची सुरक्षा आता वाढण्यात आलीये. पोलिस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला आहे. या फोननंतर खळबळ उडाली. मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी 8:46 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर फोन आला आणि थेट गडकरी यांच घर बॉम्बने उडवून टाकणार असल्याचे म्हटले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे घर बॉम्बने उडवण्याचा धमकीचा फोन 

या धमकीच्या फोननंतर स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. धमकीच्या फोननंतर नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर प्रताप नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस आणि श्वान पथक गडकरी यांच्या घरात शोध मोहीम राबवत आहेत. यादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रत्येक बारीक गोष्टीवर पोलिसांची नजर आहे.

धमकीचा फोन येताच तपास यंत्रणांची धावपळ 

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमध्ये असतानाच असा धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली आहे. नितीन गडकरी हे सध्या त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आहेत. गडकरींच्या घराबाहेर छावणीचे स्वरूप प्राप्त झालंय. पोलिस दलातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनी देखील गडकरींच्या घराकडे धाव घेतली. आजुबाजूच्या परिसराचा तपास कसून केला जात आहे.

गडकरी नागपुरातील बंगल्या असतानाच धमकी आल्याने खळबळ 

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याच्या धमकीनंतर आता पोलिसांनी एकाला ताब्यात देखील घेतलंय. त्याच्याकडून आता कसून चाैकशी केली जात आहे. नितीन गडकरी यांचे घर बॉम्बने उडवण्याचा धमकीचा फोन आल्यानंतर मोठी धावपळ तपास यंत्रणांची सुरू झाली, कारण गडकरी हे त्याच बंगल्यात होते. आता या बॉम्बने उडवण्याच्या धमकी प्रकरणी काय खुलासे होतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, काहीवेळ नागपूरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

एका आरोपीला अटक 

उमेश राऊत अस कॉल करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो मेडिकल परिसरातील देशी दारूच्या दुकानात नोकरी करतो.  आपल्या एका मित्रासोबत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत भाड्याने राहतो. धमकीचा कॉल येताच पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सेक्युरिटीला याची माहिती दिली आणि बिडीडीएस पथकाच्या त्यांच्या दोन्ही घरी पोहचले. मात्र, दोन्ही ठिकाणी काहीच मिळून आलं नाही. पोलिसांनी आता त्याची चौकशी सुरू केली असून त्याने असा धमकीचा कॉल का केला याचा शोध घेत आहे. आरोपीचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात पुढे आलं.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा