उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची विधान परिषदेची ऑफर नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

| Updated on: Oct 31, 2020 | 2:03 PM

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं वृत्त असतानाच काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.

उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची विधान परिषदेची ऑफर नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट
Follow us on

नागपूर: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं वृत्त असतानाच काँग्रेसनेही त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली होती. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. (urmila matondkar not accepted congress mlc offer)

टीव्ही9 मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं त्या म्हणाल्या. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

उर्मिला मातोंडकर आमच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रनौतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं असं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक आहे, असं त्यांनी सांगितलं.

आघाडीत कुरबूर नाही

निधी वाटपावरून अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर त्यांना विचारलं असता अशोक चव्हाण यांचं भाषण मी ऐकलं नाही. पण मध्यंतरी निधी कमी मिळाला होता. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला होता. त्यानंतर सर्वांना समान निधी मिळाला, असं सांगतानाच सरकारमध्ये कोणतीही कुरबूर नाही. ज्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, असंही ते म्हणाले.

मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्याबाबत आम्ही प्रयत्न करतोय. पण ही लढाई श्रेयवादाची केलीय. लोकल सुरु करण्यासाठी आम्ही पत्र दिल्यावर रेल्वेनं पत्र दिलं. त्यावर चर्चा करुन मार्ग काढू, लवकरच लोकल सर्वांसाठी सुरु होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (urmila matondkar not accepted congress mlc offer)

संबंधित बातम्या:

उर्मिला मातोंडकरांकडून शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार; सूत्रांची माहिती

उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील – संजय राऊत

Special Report | शिवसेना उर्मिला मातोंडकरांना आमदार करणार?

(urmila matondkar not accepted congress mlc offer)