AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उद्धव ठाकरेंमुळे राणेंना स्वत:च्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले, राग असणारच”

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भाजपा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. (Vaibhav Naik gave answer to Narayan Rane allegations on Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरेंमुळे राणेंना स्वत:च्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले, राग असणारच
| Updated on: Oct 27, 2020 | 7:12 PM
Share

सिंधुदुर्ग: शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भाजपा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. गेल्या 15 वर्षात राणेंनी उद्धव ठाकरेंवर अनेकदा टिका केली पण उद्धव ठाकरेंसाठी राणे हा संपलेला विषय असल्यामुळे त्यांनी या 15 वर्षात कधीही राणेंचे नाव घेऊन टीका केली नाही. “उद्धव ठाकरेंमुळे राणेंना गेल्या 15 वर्षात स्वतःच्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले. पक्ष सोडावे लागले त्यामुळे राणेंचा उद्धव ठाकरेंवर राग असणे स्वाभाविक आहे”, असं वैभव नाईक म्हणाले. (Vaibhav Naik gave answer to Narayan Rane allegations on Uddhav Thackeray)

दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दरवर्षीच्या दसरा मेळाव्याला शिवसेनापक्षप्रमुख महाराष्ट्राला मार्गदर्शन करतात. उद्धव ठाकरे केंद्र सरकारबद्दल बोलले. मराठा, धनगर आरक्षणाबद्दल बोलले होते. दसरा मेळाव्यातील भाषणात ही उद्धव ठाकरेंनी राणेंचे नाव घेतलं नाही. परंतु, त्यांनी दिलेलं एक उदाहरण राणेंना चपखल बसल्यामुळे त्यांचा संताप झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उच्चार करून राणेंनी असंस्कृतपणा दाखवून दिला आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंसारख्या सुसंस्कृत तरुणावर राणेंनी आरोप करणे चुकीचे आहे. राणेंच्या दोन मुलांमुळे राणेंवर काय परिस्थिती ओढवली हे राज्यातील साऱ्या जनतेने पाहिलं आहे. राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी शिवसेनेला आव्हान देण्याचा गोष्टी करू नये कारण त्यांच्या आव्हानामध्ये काही दम राहिलेला नाही. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यावर केलेली टीका त्यांची वैचारिक दिवाळखोरी दर्शवते, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री ठाकरेंनी राणे यांची तुलना बेडकाशी करत, एक बेडून आणि त्याची दोन पिल्ल डराव डराव करत आहेत, अशा शब्दात टीकास्त्र डागलं होतं. ‘एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झाला’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेवर टीका केली.

नारायण राणेंचे प्रत्युत्तर

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ताळमेळ नसलेलं, निर्बुद्ध आणि शिवराळ बरळणं होतं. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने कसं बोलावं, याचं उद्धव ठाकरेंना भान नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस आहे, अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं.

संबंधित बातम्या :

Mumbai | ..तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आलीच नसती, नितेश राणेंचा प्रहार

घणाघाती भाषणानंतर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली, आज रात्रीच संवाद साधणार

(Vaibhav Naik gave answer to Narayan Rane allegations on Uddhav Thackeray)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.