“दादा, आम्ही दूषित आणि तुम्ही बाटलीतलं पाणी पिताय, आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा” महिलेची अजित पवारांना विनंती

| Updated on: Jul 29, 2022 | 3:15 PM

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमोर महिेने मांडल्या व्यथा…

दादा, आम्ही दूषित आणि तुम्ही बाटलीतलं पाणी पिताय, आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा महिलेची अजित पवारांना विनंती
Follow us on

वर्धा : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते स्थानिकांच्या भेटी घेत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत. यात काही लोकांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या आहेत. एका महिलेने पिण्याच्या पाण्याची समस्या (Water Problem) त्यांना बोलून दाखवली. कान्होली गावातील वर्षा ईटनकर (Varsha Itankar) यांनी आपलं गाऱ्हाणं थेट अजितदादांपुढे मांडलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासाठी पॅक पाण्याच्या बाटल्या आणल्याचा संदर्भ दिला. कान्होली गावात दूषित पाणी येतं, गढूळ पाणी आम्हाला प्यावं लागतंय. अजितदादा तुमच्यासाठी बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणल्या गेल्या. आम्ही अशा पाण्याच्या बाटल्या पहिल्यांदा या गावात बघितल्यात. तुम्ही आणि रणजित कांबळे यांनी हे पाणी का नाही पिलं? बाहेरुन बाटल्या का आणल्या?, असा सवाल त्यांनी विचारला.

विदर्भ दौऱ्यादरम्यान कान्होली गावातील वर्षा ईटनकर यांनी आपलं गाऱ्हाणं थेट अजितदादांपुढे मांडलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासाठी पॅक पाण्याच्या बाटल्या आणल्याचा संदर्भ दिला. “आमच्या गावात दूषित पाणी येतं, गढूळ पाणी आम्हाला प्यावं लागतंय. अजितदादा तुमच्यासाठी बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणल्या गेल्या. आम्ही अशा पाण्याच्या बाटल्या पहिल्यांदा या गावात बघितल्यात. तुम्ही आणि रणजित कांबळे यांनी हे पाणी का नाही पिलं? बाहेरुन बाटल्या का आणल्या?”, असा सवाल त्यांनी विचारला.

हे सुद्धा वाचा

महापुरात मोठं नुकसान झालंय. सगळे येऊन बघून जातात. मदत कुणी करत नाही. गावाचं पुनर्वसन झालेलं नाही. भिंतींना ओल आलीये. सरकारी मदत कधी मिळणार याची आम्ही वाट बघतोय, असं म्हणत या महिलेने आपल्यासह आपल्या गावातील इतरांना भेडसावणाऱ्या समस्या अजित पवारांपुढे मांडल्या आहेत.

पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले

विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडतोय. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या, अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

कापूस आणि सोयाबीनची वाढ खुंटली आहे. कापूस आणि सोयाबीन ही या भागातील महत्त्वाची पिके आहेत. त्यामुळे या पिकांना हेक्टरी भरीव मदत देणे गरजेचे आहे. खरीपाच्या पेरणीचा हंगाम आता निघून गेलाय. रब्बीला अजून वेळ आहे. त्यामुळे आता पुन्हा पेरणी केली तर ती धड खरीपात मोडणार नाही आणि धड रब्बीतही मोडणार नाही. त्यामुळे चारही कृषी विद्यापीठे, कृषी आयुक्तांनी, कृषी सचिवांनी आता यात लक्ष घालून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करावा, अशी सूचनाही ही त्यांनी केली.