Video : राणेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, राणेंनीही गाडी थांबवत शिवसैनिकांवर नजर रोखली!

| Updated on: Aug 28, 2021 | 11:41 PM

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळमध्ये पोहोचली. राणे यांचा ताफा शिवसेना कार्यालयासमोर जात होता. त्यावेळी काही शिवसैनिक हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राणेंनीही आपली गाडी काही वेळ तिथेच थांबवली आणि घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांवर नजर रोखली!

Video : राणेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, राणेंनीही गाडी थांबवत शिवसैनिकांवर नजर रोखली!
नारायण राणेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी
Follow us on

कुडाळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणेंनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर राणेंना झालेली अटक व सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यात सध्या नारायण राणे विरुद्ध शिवसेना असं राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळमध्ये पोहोचली. राणे यांचा ताफा शिवसेना कार्यालयासमोर जात होता. त्यावेळी काही शिवसैनिक हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राणेंनीही आपली गाडी काही वेळ तिथेच थांबवली आणि घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांवर नजर रोखली! (ShivSainiks shouting slogans in front of Narayan Rane’s convoy)

राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल होण्यापूर्वीत मंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी इशारा दिला होता. राणेंनी वैयक्तिक टीका केली तर जशास तसं उत्तर मिळेल असं वैभव नाईक म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज राणेंची जनआशीर्वाद यात्रा कुडाळमध्ये दाखल झाली. त्यावेळी शिवसेना कार्यालयासमोर राणेंचा ताफा पोहोचला असता उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी शिवसैनिकांच्या हातात भगवे झेंडे होते. ही घोषणाबाजी पाहून राणेंनीही आपली गाडी काही वेळ थांबवली आणि शिवसैनिकांवर नजर रोखली. त्यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत राणेंचा ताफा पुढे नेला.

‘गाडी उभी केल्यावर जो तो मागे पुढे मागे पुढे जायला लागला’

दरम्यान, या प्रकारानंतर बोलत असताना राणेंना शिवसेनेला जोरदार टोले लगावले. आमदार काय करतात तर धमकी देतात की जनआशीर्वाद यात्रा आम्ही येऊ देणार नाही. रस्त्यानं येत होतो तेव्हा गाडीच्या मागे लपत होते. मी मुद्दाम गाजी उभी केली. गाडी उभी केल्यावर जो तो मागे पुढे मागे पुढे जायला लागला. शेवटी पोलीस आले. त्यांनी गाडी पुढे न्यायला सांगितली. काय दम आहे हो यांच्यात? आज महाराष्ट्रात 10 दिवस झाले फिरतोय तरी कुणी गाडी आडवेना ओ. तसे गाडीचे टायर मोठे आहेत आमच्या. मला काही फरक पडत नाही. धमक्या बिमक्या नको देऊ, असा इशाराच राणे यांनी यावेळी आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेला दिलाय.

संबंधित बातम्या : 

संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर, अनिल परबांनाही इशारा

Video : जन-आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जोरदार शॉक!

ShivSainiks shouting slogans in front of Narayan Rane’s convoy