AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शपथ घेताना उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख, मिलिंद नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.

शपथ घेताना उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख, मिलिंद नार्वेकर नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Jul 28, 2024 | 12:20 PM
Share

Milind Narvekar MLC Oath Ceremony :  महाराष्ट्र विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांनी आज रविवारी 28 जुलै रोजी शपथ घेतली. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.

विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबचा उल्लेख केला. त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करुन मी शपथ घेतो की मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार, जय हिंद जय महाराष्ट्र”, असे मिलिंद नार्वेकर शपथ घेताना म्हणाले.

तर भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘शेवटी जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ असे म्हटले. तर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना ‘जय लहूजी, जय भीम, जय संविधान’ असे म्हटले. तसेच अमित गोरखे यांनी गळ्यात जय लहूजी असं लिहिलेला एक पट्टा घातला होता. सध्या या सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘या’ आमदारांनी घेतली शपथ

  • पंकजा मुंडे – भाजप
  • योगेश टिळेकर – भाजप
  • अमित गोरखे – भाजप
  • परिणय फुके – भाजप
  • सदाभाऊ खोत – भाजप
  • भावना गवळी – शिंदे शिवसेना
  • कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना
  • शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  • राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  • प्रज्ञा सातव – काँग्रेस
  • मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.