AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपुरात आमदार निवडीचा वाद हायकोर्टात, शपथपत्रात गंभीर गुन्हे लपवल्याचा पराभूत उमेदवाराचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार निवडीचा वाद हायकोर्टात पोहोचला (petition filed against MLA subhash dhote) आहे.

चंद्रपुरात आमदार निवडीचा वाद हायकोर्टात, शपथपत्रात गंभीर गुन्हे लपवल्याचा पराभूत उमेदवाराचा आरोप
| Updated on: Feb 02, 2020 | 10:16 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार निवडीचा वाद हायकोर्टात पोहोचला (petition filed against MLA subhash dhote) आहे. काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी शपथपत्रात गंभीर गुन्हे लपवल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी  केला आहे. त्यामुळे धोटे यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान देत वामनराव चटप यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात हायकोर्टाने आमदार धोटे यांना नोटीस जारी केली असून यावर उत्तर मागितले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील पराभूत शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सुभाष धोटे यांनी शपथपत्रात गंभीर गुन्हे लपविल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी आमदार धोटे यांच्यावर एका प्रकरणात अॅट्रोसिटीचे गुन्हा दाखल झाला होता. त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीतही राहावे लागले होते, असा आरोप चटप यांनी केला आहे.

मात्र धोटे यांनी शपथपत्र आणि जाहीर प्रसिद्धीपत्रकात हे गुन्हे लपवले आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या मतदारांची फसवणूक केली आहे असा दावाही याचिकेत चटप यांनी केला  (petition filed against MLA subhash dhote) आहे.

दरम्यान या याचिका आणि नोटीसबाबत प्रसारमाध्यमांतून माहिती मिळाल्याची माहिती सुभाष धोटे यांनी म्हटले आहे. अॅड. चटप पराभव पचवू शकत नसल्याने त्यांनी हे प्रयत्न सुरु केले आहेत. योग्य वेळी आपण या नोटीशीला उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया सुभाष धोटे यांनी दिली.

या प्रकरणात धोटे यांना 13 मार्च रोजी उच्च न्यायालयात उपस्थित राहून उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.  या मतदारसंघातून चटप 2501 कमी मतांनी पराभूत झाले होते. या प्रकरणी धोटे यांची आमदारकीबाबत न्यायालय काय निर्णय देते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले  (petition filed against MLA subhash dhote) आहे.

Follow Us
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?