Video | ‘काँग्रेसचं काळं कुत्र जरी आलं तर झोडून काढू’, अनिल बोंडेंची Audio Clip व्हायरल!

Dr. Anil Bonde Viral Audio Clip : अनिल बोंडे यांनी म्हटलंय की, लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून गमजा करत असेल आणि उद्या काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर त्याला झोडल्या शिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही.

Video | काँग्रेसचं काळं कुत्र जरी आलं तर झोडून काढू, अनिल बोंडेंची Audio Clip व्हायरल!
अनिल बोंडे यांची व्हायरल ऑडिओ!
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 8:37 AM

अमरावती : काँग्रेसविरोधात तीव्र शब्दांत हल्लाबोल केल्यानंतर काँग्रेसचे नेते मोदींविरोधात आक्रमक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minster Narendra Modi) यांचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात काँग्रेस निदर्शनं करणार आहे. दरम्यान, त्याआधी बुधवारी संध्याकाळी डॉ. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात अनिल बोडें यांनी म्हटलंय की, ‘आज नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी म्हटलं की काँग्रेसचं काळं कुत्र जरी भाजप कार्यालयावर आलं, तर झोडून काढू! एका व्यक्तीसोबत फोनवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळे आता नवा वाद झेडला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आज राज्यभर मोदींविरोधात निदर्शनं करणार आहेत. त्याआधी अनिल बोंडे (BJP Leader Anil Bonde) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना थेट आव्हान दिलंय. याबाबतची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. एका व्यक्तीनं नाना पटोलेंच्या मोदींविरोधात नियोजित निषेध आंदोलनाबाबत बोलताना अनिल बोंडे यांनी हे वादग्रस्त विधान केल्यानं आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अनिल बोंडे?

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल बोंडे यांनी फोनवर बोलताना म्हटलंय, की

आज नाना पटोले यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सगळ्या भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार…भाजपने माफी मागावी म्हणून! खरे तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची या काँग्रेसवाल्यांनीच माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रमध्ये कोरोनाच्या काळात ते कोणाच्याच कामाला आले नाही, मुख्यमंत्री आले नाही, नाना पटोले फिरकले नाही. लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून गमजा करत असेल आणि उद्या काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर त्याला झोडल्या शिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही.

वातावरण तापणार

अनिल बोंडे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांचा उल्लेख चक्क काँग्रेसचे काळे कुत्रे असा केल्यानं वाद पेटण्याची चिन्ह आहेत. अनिल बोंडे यांनी थेट इशारा दिल्यामुळे काँग्रेस आणि भाजपात राडा होण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आता काय प्रतिक्रिया हे पाहणंही महत्त्वाचंय. तसंच अनिल बोंडेंचीही प्रतिक्रिया काय येते, यावरही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

अनिल बोंडे यांची व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी पाहा व्हिडीओ –

काँग्रेसची मोदींविरोधात आंदोलनं!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसतर्फे आज सकाळी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून महाराष्ट्राचा अवमान केल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात येणार आहे. फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी काँग्रेसकडून मोदींविरोधात निदर्शनं केली जाणार आहे. महाराष्ट्रामुळे यूपी-बिहारमध्ये कोरोना पसरला असा गंभीर आरोप मोदींनी लोकसभेत बोलताना केला होता.

संबंधित बातम्या :

‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’, नाना पटोलेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटे काँग्रेसवरच टीका, खडसेंचा टोला; चंद्रकांत पाटलांनाही प्रत्युत्तर

VIDEO: अगर काँग्रेस ना होती तो.. PM नरेंद्र मोदींनी सभागृहात पाढा वाचला, काँग्रेसच्या जखमेवर मीठ, प्रचंड गदारोळ