बिहार निवडणुकीत आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, प्रकाश आंबेडकरांचा दावा

| Updated on: Nov 08, 2020 | 11:19 PM

बिहार निवडणुकीमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, असा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

बिहार निवडणुकीत आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, प्रकाश आंबेडकरांचा दावा
Follow us on

अकोला : बिहारच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान शनिवारी पार पडलंय. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. अशातच बिहार निवडणुकीमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, असा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. (We Will now 20-22 Seats in bihar Says prakash Ambedkar)

“आमच्या प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्सने विकासाला केंद्रबिंदू मानून प्रचारात वास्तव मुद्द्यांवर भर दिला. आमच्यामुळेच बिहारची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आली, असं सांगताना बिहारमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. बिहार विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल”, असं भाकितही त्यांनी यावेळी वर्तवलं.

“बिहार निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींचं भाषण दाखवलं पण मोदींच्या सभेची गर्दीचं दाखवली नाही. कारण शब्दांनी लोकांचं पोट भरत नाही. लोकं हाताला काम मागतात हे आता भाजपला आता कळालं आहे. समाजातील राजकीय आणि वैचारिक घुसळणीला बिहारच्या निवडणुकीने सुरुवात झाली आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

“बिहार निवडणुकीमध्ये कुणालाही बहुमत मिळेल, अशी परिस्थिती नाही. निवडणुकीअगोदर एकीबरोबर लग्न कारायचं आणि निवडणुकीनंतर मैत्रिणीबरोबर पळून जायचं असं बिहारमध्ये होईल”, अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रात जसं घडलं तसं बिहारमध्येही घडेल का? पत्रकारांच्या या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘तिथे काय होईल मी सांगितलंय, मी कम्पेअर करणार नाही’.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरुद्ध भाजप असा जोरदार संघर्ष सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना खोचक सवाल विचारला आहे. राज्यात आता जवळपास सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत. पण मंदिरं अद्याप सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यावरुन भाजपची आध्यात्मिक आघाडीही जोरदार आंदोलन करत आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनीही मंदिराच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारलेत.

संबंधित बातम्या

“आचार्य उद्धव ठाकरे मंदिरं कधी सुरु करणार?” प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल