“आचार्य उद्धव ठाकरे मंदिरं कधी सुरु करणार?” प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

"आचार्य उद्धव ठाकरे, आचार्य अजित पवार आणि आचार्य बाळासाहेब थोरात मंदिरं कधी सुरु करणार आहात? आचार्य आणि हभप यांचं वाकडं आहे का?" हभप यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं म्हणून यांना राग आला आहे का? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारले आहेत.

आचार्य उद्धव ठाकरे मंदिरं कधी सुरु करणार? प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 5:59 PM

अकोला: मंदिरं सुरु करण्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरुद्ध भाजप असा जोरदार संघर्ष सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना खोचक सवाल विचारला आहे. राज्यात आता जवळपास सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत. पण मंदिरं अद्याप सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यावरुन भाजपची आध्यात्मिक आघाडीही जोरदार आंदोलन करत आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनीही मंदिराच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारलेत. (Prakash Ambedkar criticize CM Uddhav Thackeray on temple issue )

“आचार्य उद्धव ठाकरे, आचार्य अजित पवार आणि आचार्य बाळासाहेब थोरात मंदिरं कधी सुरु करणार आहात? आचार्य आणि हभप यांचं वाकडं आहे का?” हभप यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं म्हणून यांना राग आला आहे का? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारले आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची, कोरोनाबाबत तात्पुरती रुग्णालये उभी करण्याची ताकद मंदिर संस्थांमध्ये आहे, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.

राज्यातील सर्व मोठ्या मंदिरांनी सरकारला एक ऑफर दिली होती, अशी माहितीही आंबेडकरांनी दिली आहे. ‘भाविकांसाठी मंदिरं सुरु करा, आम्ही चाचणी करतो. कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मंदिरांची असेल. सरकार सांगेल तिथे कोविड सेंटर उभे करण्याची तयारी मंदिरांनी दाखवली होती, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरला विठ्ठल-रुख्मिणी मंदिरावर वारकरी मोर्चा काढण्यात आला होता. राज्यातील सर्व मंदिरं सुरु करा अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. पण राज्य सरकारने अद्याप मंदिरं सुरु करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यावरुन आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांना खोचक प्रश्न विचारले आहेत.

मंदिरं, प्रार्थनास्थळांबाबत दिवाळीनंतर नियमावली

राज्यातील धार्मिकस्थळं दिवाळीनंतर उघडणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मंदिरं उघडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर गंडांतर येऊ नये म्हणून सावध पावलं टाकत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागलंय : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar criticize CM Uddhav Thackeray on temple issue

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.