Eknath Shinde : रात्री काय काय घडलं? सूरत ते गुवाहाटी! एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, रातोरात घडलेल्या 9 मोठ्या घडामोडी

| Updated on: Jun 22, 2022 | 7:48 AM

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जाणून घेऊयात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते आतापर्यंत घडलेल्या 9 प्रमुख घडामोडी.

Eknath Shinde : रात्री काय काय घडलं? सूरत ते गुवाहाटी! एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, रातोरात घडलेल्या 9 मोठ्या घडामोडी
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी शिवसेनेतून (shivsena) बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण 35 आमदार असल्याचा दावा देखील केला जात आहे. या आमदारांचा एक फोटो देखील व्हयरल झाला आहे. एकनाथ शिंदे सोमवारी विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून ते नॉटरिचेबल होते. मंगळवारी ते सुरतमध्ये (surat) होते. तर आज आसाममध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदेसोबत प्रहारचे बच्चू कडू देखील आहेत. बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. मात्र इथूनपुढे हिंदुत्त्वाशी फारक घेणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सोबतच एकनाथ शिंदे यांनी काल एक ट्विट देखील केले होते. त्या ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख केला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख टाळण्यात आला होता. जाणून घेऊयात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते आतापर्यंत घडलेल्या 9 प्रमुख घडामोडी.

  1. एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर सुरतमध्ये होते. त्यानंतर ते सुरतहून आसामच्या दिशेने निघाले. एकनाथ शिंदे हे आसाममध्ये पोहोचले आहेत. त्यांचं विमान गुवाहाटीमध्ये पोहोचलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 33 तर अपक्षाचे 3 आमदार आहेत.
  2. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली, मात्र यापुढे हिंदुत्त्वाशी फरकत घेणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. दरम्यान मी शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणारही नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र आता गर्व से कहों हम हिंदू है , हा बाळासाहेब ठाकरेंचा नारा पुन्हा देण्याची वेळ आल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
  5. एकनाथ शिंदेंनी केवळ शिवसेनेचे आमदारच नाही तर ठाकरे सरकारचे चार मंत्री देखील फोडले आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि रोहयो राज्यमंत्री संदीपान भुमरे हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
  6. मविआला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना-भाजप युती व्हावी, गुजरात सोडताना
    शिवसेना बंडखोर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया
  7. मध्यरात्रीनंतर सुरतच्या विमानतळावर तगडा फौजफाटा, गुजरात पोलिसांच्या सुरक्षा कडेत सेनेचे बंडखोर आमदार स्पाईस जेटच्या विमानातून आसामच्या गुवाहाटीकडे रवाना, गुवाहाटीला पोहोचले.
  8. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 33 आमदारांसोबत मविआतून बच्चू कडूंच्या प्रहारलाही
    फोडलं, 1 आमदारासहीत खुद्द बच्चू कडू सुद्धा शिंदेंच्या गोटात
  9. बंडानंतर रात्री उशिरा सेनेतल्या नाराज आमदारांचा शिंदेंकडून नवा गट, मात्र इकडे मुंबईत शिंदेंना हटवून अजय चौधरींची सेनेकडून गटनेतेपदी निवड.
  10.  एकनाथ शिंदेंच्या बंडाला भाजपाचे बळ भाजपचे नेते एकनाथ शिंदेंसोबत