धर्म आणि इतिहासाचा वापर कशासाठी, जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं

| Updated on: Nov 10, 2022 | 4:09 PM

द्वेषानं हा देश तुटेल. माणसं जोडली गेली पाहिजे.

धर्म आणि इतिहासाचा वापर कशासाठी, जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं
जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं
Image Credit source: tv 9
Follow us on

नांदेड : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आली आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड सहभागी झालेत. महाविकास आघाडी ही काही तुटली नव्हती. काही जण स्वप्नरंजन करत असतात, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. स्वप्नरंजनाला उत्तर द्यावचं असं काही नसतं. वेळेवर दिसत काही खरं नि काय खोटं. राहुल गांधी हे पंधराशे किलोमीटरचा टप्पा ओलांडून जात आहेत. देशाची विचारधारा ही सर्वधर्मसमभावाची आहे. सगळ्यांना घेऊन जाण्याची आहे. देशाच्या संविधानानं सर्वांना एकत्र केलंय.

द्वेषानं हा देश चालू शकणार नाही. द्वेषानं हा देश तुटेल. माणसं जोडली गेली पाहिजे. स्वातंत्र्याचं स्वप्न हे सर्व जातिधर्मातील लोकांसाठी होतं. सगळा समाज एकत्र आलं होतं. पुन्हा देशाला एकता प्रस्तापित करायची असेल, तर मूळ भारताला अस्तित्वात आणावं लागेल. सर्वांना एकत्र सोबत घेऊन जाऊ, असा संदेश या भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं समोर येतोय.

राज्या-राज्यात विरोधाभास दिसतोय. केंद्र-राज्यात विरोधाभास दिसतो. सर्वांना एकत्र ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे. सर्व समाजाला एकत्र ठेवणं ही संविधानिक जबाबदारी आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

चित्रपटावरून वाद निर्माण झाला. इतिहास इतिहासाच्या नजरेनं बघा. कबर ही तिसऱ्या, चौथ्या माणसानं बांधलेली नाही. जिजामातेच्या आदेशावरून ती कबर बांधली आहे. जिजामातेनं शिवरायाला आदेश दिला. वैर संपलं. त्यानंतर कबर बांधण्यात आली. त्याच्याबद्दल काय बोलायचं हे ज्यानी त्यानी ठरवावं. इतिहासाचं विकृतीकरन करू नका, हेच आमचं म्हणणंय.

लोकांची मनं बदलवायची असतात. तेव्हा धार्मिक आधार असतो. त्यात लोकांची डोकी फिरतात. धर्माचा वापर डोकी फिरविण्यासाठी वापरला जातो. किंवा इतिहास असा वापरतात की, जेणेकरून लोकांची डोकी फिरली पाहिजेत, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.