नाशिकचे पालकमंत्री कोण? शिवसेना-राष्ट्रवादीत रस्सीखेच

| Updated on: Jan 01, 2020 | 5:10 PM

कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार याबाबत जशी उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता पालकमंत्रीपदाबाबत (Nashik Guardian Minister) आहे.

नाशिकचे पालकमंत्री कोण? शिवसेना-राष्ट्रवादीत रस्सीखेच
Follow us on

नाशिक : नाशिकचे नवे पालकमंत्री (Nashik Guardian Minister) कोण याबाबतची चर्चा आता रंगू लागली आहे. महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. अद्याप खातेवाटप झालेलं नाही. कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार याबाबत जशी उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता पालकमंत्रीपदाबाबत (Nashik Guardian Minister) आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचं नाव पालकमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.

भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये गिरीश महाजन यांनी नाशिकचं पालकमंत्रीपद भूषवलं. आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्याने नाशिकचं पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं दिसून येतं आहे.

शिवसेनेचे दादा भुसे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं समजतंय. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची माळ दादा भुसे यांच्याच गळ्यात पडावी यासाठी शिवसैनिक आणि पदाधिकारी आग्रही आहेत. मात्र यापूर्वीचा अनुभव आणि ज्येष्ठता पाहता छगन भुजबळ यांनाच पालकमंत्रीपद मिळेल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा विषय हा अजून बाकी आहे, खातेवाटप झाल्यावर पालकमंत्रीपदाचं बघू असं छगन भुजबळांनी सांगितलं.  त्यामुळे आता कोणाच्या गळ्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदाची माळ पडते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.