दसरा मेळावा कोणाचा शिंदे गट की शिवसेना?, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं 

| Updated on: Sep 09, 2022 | 2:34 PM

सध्या दसरा मेळाव्यावरून जोरदार वाद सुरू आहे. एकीकडे आम्हाला परवानगी मिळाली तरी आणि नाही मिळाली तरी आम्हीच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गट देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे.

दसरा मेळावा कोणाचा शिंदे गट की शिवसेना?, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं 
Image Credit source: Google
Follow us on

पुणे:  सध्या दसरा मेळाव्यावरून जोरदार वाद सुरू आहे. एकीकडे आम्हाला परवानगी मिळाली तरी आणि नाही मिळाली तरी आम्हीच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार असा दावा शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे (Eknath Shinde) गट देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. अशा परिस्थितिमध्ये आता शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मान हा बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेचा असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं अजित पवारांनी?

दसरा मेळावा नेमका कोणाचा याबाबत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की खरं पाहिलं तर हा वाद निरर्थक आहे. दोन्ही गटांनी आपआपल्या परीने दसरा मेळावा घ्यावा. खर पाहिलं तर हा मान बाळासाहेबांच्याच शिवसेनेचा आहे. आता इथून पुढे उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचं नेतृत्व करतील असं बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवरू सांगितं होतं. हे आपण सर्वांनीच ऐकलं आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मान हा शिवसेनेचाच असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांना इशारा

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना पुन्हा एकदा फडणवीसांना इशारा दिला आहे. ही बारामती आहे. बारामतीकरांना चांगलं माहीत आहे कोणतं बटन दाबायचं. ते योग्यवेळी योग्य निर्णय घेतील. बारामतीकरांना माझं काम माहीत आहे. उगच बारामतीला धडका घेऊ नका डिपॉझिट जप्त होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा