बंगल्यांचं वाटप झालं खाते वाटपाचं काय? पालकमंत्रीपद अजूनही रिक्तच; पुन्हा शिंदे,फडणवीस आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर

राज्यातील मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालं, मात्र अद्यापही खाते वाटप होत नाही. पालकमंत्रीपदे अजूनही रिक्तच असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

बंगल्यांचं वाटप झालं खाते वाटपाचं काय? पालकमंत्रीपद अजूनही रिक्तच; पुन्हा शिंदे,फडणवीस आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 1:48 PM

पुणे : आज अनंत चतुर्दशी आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष दिसून येत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज पुणे (pune) दौऱ्यावर आहेत. पुण्यातील उत्सव पहाण्यासाठी ते शहरात आले आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे (Eknath Shinde), फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालं, मात्र अद्यापही खाते वाटप होत नाही. पालकमंत्रीपदे अजूनही रिक्तचं असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

नेमकं काय म्हटलं आदित्य ठाकरेंनी?

आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात मंत्र्यांना बंगल्याचं वाटप होतं, मात्र अद्यापही खाते वाटप झालं नाही. जिल्हे पालकमंत्र्यांविनाच असल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शिंदे, फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून अनेकदा आता सणोत्सव हे निर्बंधमुक्त वातावरणात पार पडत असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी यावरून देखील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.

हे सुद्धा वाचा

कोरोना काळात जशी परिस्थिती होती तसे निर्णय घेण्यात आले. राज्यात निर्बंध लावल्यामुळेच आपण अनेकांचे जीव वाचू शकलो, नाहीतर महाराष्ट्रात देखील इतर राज्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली असती. कोणत्याही धर्मात लोकांचा जीव वाचवण्याची शिकवण मिळते असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

याकूब मेमनवर प्रतिक्रिया टाळली

सध्या राज्यात याकूब मेमनचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी त्यावर बोलणे टाळले. यावर मी कालच प्रतिक्रिया दिल्याचे त्यांनी म्हटंले. याकूब मेमनच्या कबरीशी महापालिका किंवा शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी बुधवारी म्हटलं होतं.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.