आदित्य ठाकरे आडनावामुळे निवडणूक जिंकले, ‘झेड’ सिक्युरिटी कशासाठी? : निलेश राणे

| Updated on: Dec 26, 2019 | 7:34 AM

"आदित्य ठाकरे कोण आहे. त्याचे महाराष्ट्रात काय योगदान? तो ठाकरे आडनावामुळे पहिली निवडणूक जिंकला." अशी घणाघाती टीका राणेंचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणेंनी केली (nilesh rane criticizes aditya thackeray) आहे.

आदित्य ठाकरे आडनावामुळे निवडणूक जिंकले, झेड सिक्युरिटी कशासाठी? : निलेश राणे
Follow us on

मुंबई : शिवसेना आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची Y+ दर्जाची सुरक्षा हटवून त्यांना Z दर्जाची सुरक्षा देण्यात येणार (nilesh rane criticizes aditya thackeray)  आहे. त्यामुळे वरळीचे आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य आता Z दर्जाच्या सुरक्षाव्यवस्थेत फिरणार आहेत. “आदित्य ठाकरे कोण आहे. त्याचे महाराष्ट्रात काय योगदान? तो ठाकरे आडनावामुळे पहिली निवडणूक जिंकला.” अशी घणाघाती टीका राणेंचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणेंनी केली (nilesh rane criticizes aditya thackeray) आहे.

“आदित्य ठाकरे एक 27 -28 वर्षाचा पोरगा आहे. त्याचे महाराष्ट्रात योगदान काय? ठाकरे आडनावामुळे तो पहिली निवडणूक जिंकला. यापलीकडे त्याचे नेमकं योगदान काय?” असा प्रश्नही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

“मीही एका माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. माझे वडीलही मुख्यमंत्री होते. मात्र Z दर्जाच्या सुरक्षा मिळण्यामागे काही तरी पार्श्वभूमी असावी लागते. मात्र आदित्यला ती मिळण्यामागे काय पार्श्वभूमी आहे. आदित्य ठाकरेंचे योगदान नेमकं काय? तो राजकारणात नसल्याने कोणाचे नुकसान होणार आहे.” असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

“Z दर्जाच्या सुरक्षा आदित्यला देण्याचे नेमकं कारण काय? त्यांना कोणाकडून धोका आहे. कोणी त्याला धमकी दिली आहे का? किंवा त्यांनी कोणाला धमकी दिली आहे. मग त्यांनी काही आंदोलन केलं आहे किंवा असा काही विषय हाताळला आहे. ज्यामुळे लोक त्यांच्या मागे पडले नेमकं अस काय घडलं आहे का? हेच मला काही कळत नाही.” असेही निलेश राणे (nilesh rane criticizes aditya thackeray) म्हणाले.

“मी माजी मुख्यमंत्राचा मुलगा आहे. मला कधीही Z दर्जाच्या सुरक्षा नव्हती. अमित देशमुख यांनाही कधी नव्हती. मग आदित्य ठाकरेंच्या Z दर्जाच्या सुरक्षा मागचे नेमकं कारण काय?” असेही निलेश राणे म्हणाले.


“Z दर्जाच्या सुरक्षा मिळण्यामागे एक प्रक्रिया असते. पोलिसांचा एक रिपोर्ट जातो. या रिपोर्टच्या आधारे Z दर्जाच्या सुरक्षा मिळणार हे ठरवलं जातं. मात्र आता गृह खातं त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मिळाली असेल त्यांना. पण माझी सत्ता आहे म्हणून मी माझ्या मुलाला Z दर्जाची सुरक्षा देणार हा सत्तेचा दुरपयोग आहे.” असाही घणाघात राणेंनी केला.

एवढंच नव्हे निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर ट्विटरवरुनही आगपाखड केली आहे. “ह्या पेंग्विनच्या अंगावर एकही पोलिस केस नाही, कोणाची धमकी नाही व ह्याने धमकी कोणाला देण्याची ह्याची लायकी सुधा नाही मग Z सुरक्षा कशाला?? हा उघड सत्तेचा दुरोपयोग आहे आणि हा दुरोपयोग महाराष्ट्राच्या जनतेला पटणारा नाही. ठाकरे लवकरच तोंडावर आपटणार,” असे ट्विट निलेश राणेंनी केले (nilesh rane criticizes aditya thackeray) आहे.