पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे अनिल देसाईंच्या नावावर फुली?

| Updated on: May 30, 2019 | 12:14 PM

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. काही मंत्र्यांना नव्या जबाबदारीसह पुन्हा आणलं जाणार आहे. तर काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात जास्त उत्सुकता आहे ती मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या नव्या […]

पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे अनिल देसाईंच्या नावावर फुली?
Follow us on

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. काही मंत्र्यांना नव्या जबाबदारीसह पुन्हा आणलं जाणार आहे. तर काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात जास्त उत्सुकता आहे ती मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या नव्या चेहऱ्यांची आणि शिवसेनेला मिळणाऱ्या मंत्रिपदांची.

शिवसेनेला मोदींच्या मंत्रिमंडळात किती मंत्रिपदं मिळणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आज अरविंद सावंत हे शिवसेनेकडून मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

….म्हणून अनिल देसाईंचं नाव मागे

सध्यातरी शिवसेनेला एकच मंत्रिपद देण्यात आले आहे. अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले आहे. लोकसभा कोट्यातून मंत्रिपद देणार असल्याचा आग्रह स्वत: मोदींनी केला होता. यामुळे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांचं नाव सध्या मंत्रिपदाच्या शर्यतीत मागे पडलं आहे. जनतेतून निवडून लोकसभेत पोहोचलेल्या खासदारांना मंत्रिपद देण्याचा आग्रह आहे. त्यामुळे राज्यसभेवरील अनिल देसाईंचं नाव तूर्तास मागे पडलं आहे.

संबंधित बातम्या 

Modi ministry : मोदी-शाहांकडून शिक्का, मोदींच्या संभाव्य मंत्रिमंडळात कोण कोण?    

ठरलं! शिवसेनेचा एकमेव मंत्री, उद्धव ठाकरेंकडून नावावर शिक्कामोर्तब  

मी मंत्रिपदासाठी उत्सुक नव्हतो : संजय राऊत